Kirit Somaiya on Shiv Sena | Kirit Somaiya on MLC Election  esakal
मुंबई

एकनाथ शिंदेंच्या पत्रकार परिषदेआधीच सोमय्यांचं ट्वीट, आकड्यांचा हिशेबच दिला

सकाळ डिजिटल टीम

विधानपरिषदेचा निकाल लागल्यापासून महाविकास आघाडीत खदखद बाहेर येत आहे. फडणवीसांनी पाचही जागा निवडून आणल्याने राज्यात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे.

त्यातच आता एकनाथ शिंदे कालपासून नॉट रिचेबल असल्याने सेनेच्या गोटातून मोठी बातमी येऊ शकते. भाजपला राज्यसभेवेळी १२३ मतं पडली होती. यंदा १३३ मतं पडल्याने मविआ सरकारची आणखी १० मतं फोडण्यात फडणवीसांना यश आलं आहे. मात्र सेनेची ११ मतं फुटल्याने शिवसेनेच्या गोटात खळबळ आहे. (Eknath Shinde News)

उद्धव ठाकरे यांनी तातडीने बैठक बोलावली आहे. मतदान करून माघारी निघालेल्या आमदारांना पुन्हा मुंबईत बोलवण्यात आलं आहे. संजय राऊत यांनी तत्काळ दिल्ली दौरा रद्द केला आहे. त्यामुळे मुंबईत घडामोडींना वेग आला आहे. (Kirit Somaiya Tweets on Eknath Shinde)

दरम्यान एकनाथ शिंदे यांनी रात्रीतून मुक्काम हालवला असून त्यांनी गुजरातमध्ये आश्रय घेतला आहे. ते आज पत्रकार परिषदही घेणार असल्याचं समोर आलंय. यातच आता किरीट सोमय्यांनी ट्वीट करत शिवसेनेवर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे यांचे बारा वाजणार असल्याचं त्यांनी म्हटलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT