मुंबई

अर्णब यांना भेटण्यासाठी गेलेल्या किरीट सोमय्यांना पोलिसांनी रोखले

महेंद्र दुसार

मुंबई - ‘रिपब्लिक टीव्ही’चे संपादक अर्णब गोस्वामी यांना पोलिसांनी अटक केलं आहे. रायगड पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना मुंबई येथील घरातून ताब्यात घेतलं आहे. वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, अलिबाग येथे अर्णब यांना भेटायला जाणारे भाजपनेते किरीट सोमय्या यांना पोलिसांनी रोखले आहे.

सुशांत सिंह राजपूत आत्महत्याप्रकरण, पालघर येथील साधू हत्या, कंगना रानौत आणि राज्य सरकारमधील वाद आदी मुद्यांवर राज्य सरकारवर टीकेची झोड उठवणाऱ्या अर्णब गोस्वामी यांना आज रायगड पोलिसांनी अटक केली. वास्तूविशारद अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. अन्वय नाईक यांनी लिहलेल्या सुसाईड नोटमध्ये अर्णब यांचे नाव असल्याचा दावा त्यांच्या कुटूंबियांनी केला होता. आज अर्णब यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

आपल्याला अटक करीत असताना पोलिसांनी धक्काबुक्की केली असल्याचे अर्णब यांनी न्यायालयात सांगितले, त्यामुळे त्यांच्या मेडिकल रिपोर्ट साठी त्यांना बाहेर नेत असताना, अचानक भाजपनेते किरीट सोमय्या त्यांच्या गाडीच्या ताफ्याजवळ आले. त्यांनी अर्णब यांना भेटण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यावेळी पोलिस आणि किरीट यांच्यातही हलकी धक्काबुक्की झाल्याचेही सुत्रांनी सांगितले आहे. दरम्यान याप्रकरणी व्यक्त होताना किरीट सोमय्या म्हटले की,  मला अर्णब यांना भेटायचे आहे. त्यांना का भेटू दिले जात नाही.? 

अर्णबला नेत असताना मी लांबून पाहत होतो. तरी पोलिसांनी मला अडवले.  ज्याप्रकारे समाजमाध्यमांवरील नेटकऱ्यांविरोधात तसेच पत्रकारांविरोधात खटले भरले जात आहेत, त्यामुळे राज्यात खरोखरंच आणीबाणी सारखी स्थिती निर्माण झाली आहे, असे सोमय्या यांनी म्हटले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahilyanagar News: अहिल्यानगरच्या चार तालुक्यांचा होणार कायापालट; आकांक्षित तालुका योजनेत प्रत्येकी ५ कोटींचा अतिरिक्त निधी

स्टेशनवर गर्दी, ट्रेनमध्ये चढण्याऐवजी वृद्ध थेट इंजिनवरच उभा राहिला; VIDEO VIRAL

दीप-ज्योतीची वाढती जवळीक तर तारिणीच्या जीवाला धोका; ‘झी मराठी’वरील मालिकांमध्ये या आठवड्यात काय घडणार?

Marathi News Live Updates : सर्वोच्च न्यायालयाने अरावली पर्वताबाबत अहवालाची मुदत वाढवण्याची याचिका फेटाळली

निवेदिता सराफ करतात ते इंटरमिटेंट फास्टिंग म्हणजे काय? किती ते किती वाजेपर्यंत करतात? म्हणाल्या, 'मी कायम...'

SCROLL FOR NEXT