mumbai sakal
मुंबई

Mumbai News : रस्त्यासाठी घारीवलीकर उतरले रस्त्यावर ; गावकऱ्यांसाठी छेद रस्ता खुला करण्याची मागणी

कल्याण शीळ महामार्गावरील घारीवली गावाजवळील छेद रस्ता हा वाहतूक विभागाच्या वतीने बंद करण्यात आला

शर्मिला वाळुंज

डोंबिवली : कल्याण शीळ महामार्गावरील घारीवली गावाजवळील छेद रस्ता हा वाहतूक विभागाच्या वतीने बंद करण्यात आला आहे. या मार्गावरील बड्या गृहप्रकल्पां समोरील छेद रस्ते सुरू असताना याच गावचा रस्ता का बंद करण्यात आला आहे ?

असा सवाल करत हा छेद रस्ता सुरू करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी घारीवली ग्रामस्थ रस्त्यावर उतरले होते. रस्त्यावर उतरत प्रशासना विरोधात गावकऱ्यांनी घोषणाबाजी केली. वाहतूक पोलिसांनी यावर चर्चा करण्याचे आश्वासन देण्यात आल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. कल्याण, डोंबिवली सह उपनगरातील शहरांना ठाणे, नवी मुंबई, मुंबई दिशेला प्रवास करण्यासाठी कल्याण शीळ मार्ग हा रस्ते वाहतूक पर्याय महत्वाचा आहे.

या मार्गावर सकाळ संध्याकाळ वाहनांची कोंडी मोठ्या प्रमाणात होत असते. कल्याण शीळ रोडवरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी या रस्त्याचे रुंदीकरण तसेच सिमेंट काँक्रीटीकरणचे काम करण्यात येत आहे. या महामार्गालगत अनेक छोटी मोठी गाव आहेत. तसेच सध्याच्या घडीला मोठमोठी गृहसंकुले उभी रहात आहेत.

यामुळे दिवसेंदिवस वाहनांच्या संख्येत वाढ होत असून या रस्त्यावरील कोंडी फोडण्यात वाहतूक विभाग अपयशी होत आहे. वाहन कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक विभागाने गावातून येणाऱ्या मुख्य रस्त्यांच्या समोरील महामार्गावरील छेद रस्ते सिमेंटचे बॅरिकेट्स लावून बंद करण्यात आले आहेत.

ग्रामस्थांनी विरोध केल्यानंतर अनेक गावांचे छेद रस्ते सुरू करण्यात आले आहेत. तसेच बड्या गृहसंकुला समोरील छेद रस्ते हे बंदच करण्यात आलेले नाहीत. असे असताना घारीवली गावचा छेद रस्ता का बंद ठेवण्यात आला आहे असा सवाल ग्रामस्थ करत आहेत.

प्रत्येक गावासाठी एक दोन छेद रस्ते तसेच बाजूच्या गृह प्रकल्पांसाठी छेद रस्ते खुले ठेवले असताना घारीवली गावचाच छेद रस्ता बंद का ? घारीवली गावकऱ्यांसाठी छेद रस्ता खुला करण्यात यावा या मागणीकडे वाहतूक विभाग व एमएसआरडीसी यांचे लक्ष वेधण्यासाठी गावकरी रस्त्यावर उतरले आहेत असे मनसेचे उपजिल्हाध्यक्ष योगेश पाटील, यांनी सांगितले. यावेळी मधुकर माळी, हरीश पाटील, गजानन पाटील यांसह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MahaRERA Ruling: महारेरा : विकसकाला घरखरेदीदाराची परवानगीशिवाय फ्लॅट बुकिंग रद्द करण्यास मज्जाव; उशिरा ताबा दिल्यास व्याज देण्याचा आदेश

Pune domestic violence FIR: मानपान व मोटार न दिल्याच्या कारणावरून विवाहितेचा छळ; पतीसह चौघांविरुद्ध नऱ्हे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Marathi Literature Centenary Funding: शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी १७ कोटी ५० लाखांचा निधी; उदय सामंत यांची मोठी घोषणा

Pune Civic Recruitment : पुणे महापालिकेतील १६९ कनिष्ठ अभियंता भरतीवर तक्रारींचे ग्रहण; परीक्षा, निकाल, पडताळणी पूर्ण तरी नियुक्ती आदेश रखडले

Medical Emergency: एक किलोपेक्षा अधिक मॅग्नेट गिळलेल्या १० वर्षीय मुलाचा जीव वाचला; विरार-मिरा रोड येथील डॉक्टरांची यशस्वी शस्त्रक्रिया

SCROLL FOR NEXT