knife Attack on jewelers Sakal
मुंबई

दिवसाढवळ्या डोंबिवलीत ज्वेलर्स मालकावर चाकूने हल्ला

घटना सीसीटिव्हीमध्ये कैद; कल्याण डोंबिवलीत गुन्हेगारीचे प्रमाण वाढते

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - डोंबिवलीतील आगरकर रोडवरील मन्ना गोल्ड ज्वेलर्स मालकावर एका अज्ञात हल्लेखोराने चाकूने हल्ला केल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. यामध्ये व्यापारी मन्ना हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सीसीटिव्हीमध्ये कैद झाली असून मारेकऱ्याने चेहरा झाकलेला असल्याने मारेकऱ्याचा शोध घेणे पोलिसांसमोर आव्हान आहे. मारेकऱ्याने दुकानातील एकही वस्तू चोरीला न गेल्याने पूर्व वैमनस्यातून हा हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. दिवसाढवळ्या व्यापाऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्याने, वाढत्या गुन्हेगारीमुळे डोंबिवलीत नेमके चालले तरी काय आहे असा सवाल उपस्थित केला जात आहे.

डोंबिवली पूर्वेला आगरकर रोड परिसरात तारकनाथ मन्ना (वय 54) हे रहातात. याच रोडवर त्यांचे मन्ना गोल्ड ज्वेलर्सचे दुकान आहे. मंगळवारी दुपारी ते आपल्या दुकानात बसले होते. पावणे बाराच्या सुमारास त्यांच्या दुकानात एक व्यक्ती शिरला. त्याने आपला चेहरा पूर्ण झाकला होता. क्षणात त्याने मन्ना यांच्या शर्टाची कॉलर पकडत त्यांना चाकूचा धाक दाखवित धमकाविले. मन्ना यांनी आवाज करण्याचा प्रयत्न करताच चूप बैठो असे सांगत त्यांच्या छातीवर व पोटावर चाकूने वार केले. वार केल्यानंतर मारेकऱ्याने दुकानातून पळ काढला. आजूबाजूच्या नागरिकांच्या ही गोष्ट लक्षात येताच त्यांनी लागलीच याची माहिती रामनगर पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मन्ना यांना तत्काळ उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. हा सर्व प्रकार सीसीटिव्ही मध्ये कैद झाला असून मारेकऱ्याने दुकानातील एकही वस्तू चोरुन न नेल्याने पूर्व वैमनस्यातून हा हल्ला झाला असावा अशा प्राथमिक अंदाज वर्तविला जात असून त्यादृष्टीने पोलिस तपास करीत आहेत.

याप्रकरणी तारकनाथ यांच्या तक्रारीवरुन रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलिस निरिक्षक सचिन सांडभोर यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक भराडे, जाधव व एम. बी. घाडगे हे अधिक तपास करीत आहेत. यासर्व प्रकरणाचा छडा लावल्यानंतरच माहिती देण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

कल्याण डोंबिवलीत गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे. दिवसाढवळ्या हातात चाकू, तलवारी नाचवत व्यापारी, बांधकाम व्यावसायिक यांना धमकाविले जात असल्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. दरम्यान काही महिन्यापूर्वी भाजपचे कार्यकर्ता मनोज कटके यांच्यावर देखील त्यांच्या दुकानात अज्ञात मारेकऱ्यांनी हल्ला केला होता. हे आरोपी अद्यापही पकडले गेले नाही आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jyotiba Temple Incident : जोतिबा डोंगरावर हायव्होल्टेज ड्रामा! बिगर सासनकाठी घेऊन आलेल्या मद्यधुंद तरुणांनी थेट पुजाऱ्यांवरच उगारला हात; पहा व्हिडिओ

Pune Accident: पुण्यातील तिघांचा अपघातात मृत्यू; एकजण गंभीर, पुणे–नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मंचरजवळ भीषण धडक, काय घडलं!

Latest Marathi News Live Update : भोंदू अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; शिवनिका संस्थानमधील ट्रस्टींचीही तपासणी होणार

महाकुंभामध्ये व्हायरल झालेली मोनालिसा भोसलेला जीवे मारण्याच्या धमक्या; व्हिडिओ शेअर करत मदतीची विनंती

LPG Cylinder Weight Reduction : गॅस संकटाचा मोठा फटका ! घरगुती LPG सिलिंडर बाबत सरकारचा नवा निर्णय

SCROLL FOR NEXT