crime news theft sakal
मुंबई

Konkan News: दापोलील घरफोडी, ५ लाखांचा ऐवज चोरीला

२५ एप्रिल ते २ मे रोजी रात्री सुमारे १० वाजेपर्यंतच्या कालावधीत सावंत आणि त्यांचे कुटुंबीय मुंबईला गेले होते

सकाळ वृत्तसेवा

Konkan News: दापोली येथील मच्छी मार्केटजवळ येथे झालेल्या घरफोडीत सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा ५ लाख ७९ हजारांचा ऐवज चोरल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी दापोली पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार हबीब अहमद युसूफ सावंत (रा. मच्छीमार्केट, दापोली) यांनी घरफोडी झाल्याची फिर्याद पोलिस ठाण्यात दिली आहे. २५ एप्रिल ते २ मे रोजी रात्री सुमारे १० वाजेपर्यंतच्या कालावधीत सावंत आणि त्यांचे कुटुंबीय मुंबईला गेले होते.

हबीब यांच्या बिल्डींगमध्ये राहणाऱ्या त्यांच्या भावजय अकिला आशिष सावंत यांनी फोन करून घरफोडी झाल्याची माहिती दिली. घराच्या खोलीची मुंबईतूनच व्हीसीद्वारे रुमची पाहणी केली. त्यावेळी हबीब सावंत आणि त्यांचे कुटुंबीय ३ मे रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत दापोलीत पोहचले.

चोरट्याने बंद खोलीचे व लाकडी कपाटाचे लॉक तोडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. कपाटातील ७५ हजार रुपयांचे तीन तोळ्याचा सोन्याचा हार, ३७ हजार रुपयांची दीड तोळ्याची चेन आणि ४ लाख ६७ हजार पय रुपये रोख असा ५ लाख ७९ हजार रुपयांचा ऐवज चोरट्याने चोरून नेला. ७ या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलिस तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Belgaum House Fire : बेळगाव हादरले! गणेशोत्सवाच्या रात्री काळाचा घाला; घरातील आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू

Mumbai-Konkan Ro-Ro Service : कोकणवासियांसाठी खूशखबर! मुंबई ते वेंगुर्ला रो-रो सेवा पुन्हा सुरू होणार, प्रवासाचा वेळ वाचणार, तिकीट दरही आवाक्यात?

India Nepal Power Supply : भारत नेपाळला दररोज १८ तास वीज पुरवणार, जलप्रलयानंतर मदतीचा हात

Latest Marathi News Update : दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंचे नाव, संजय राऊत काय म्हणाले

Petrol-Diesel Price : कच्च्या तेलाच्या भावात मोठी वाढ! हैदराबादमध्ये पेट्रोल 116 रुपयांवर; महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल-CNG किती?

SCROLL FOR NEXT