gas cylinder sakal media
मुंबई

विनापरवाना गॅस सिलिंडर वापरणाऱ्यांवर नजर; कोपरखैरणे पोलिसांची विशेष मोहीम

सकाळ वृत्तसेवा


नवी मुंबई : विनापरवाना (illegal) व असुरक्षितपणे गॅस सिलिंडरचा (Gas Cylinder) वापर करून वडापाव, चायनीज आणि इतर व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांविरोधात (Food traders) पोलिसांची आता करडी नरज आहे. कोपरखैरणे पोलिसांनी (koparkhairne police) विशेष मोहीम (special campaign) सुरू केली असून तीन दिवसांत ११ अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाई करीत गॅस सिलिंडरसह त्यांचे साहित्य जप्त (Material sized) केले आहे. सदर विक्रेते कोणत्याही प्रकारच्या सुरक्षेच्या उपाययोजना न करता उघड्यावर धोकादायकपणे गॅस सिलिंडरचा वापर करीत असल्‍याने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

नवी मुंबईत अनधिकृतपणे गॅस सिलिंडरचा वापर करून अनेकांनी पदपथावर खाद्यपदार्थ विक्रीच्या गाड्‌या लावल्‍या आहेत. उघड्यावरच खाद्यपदार्थ तयार केले जात असून सुरक्षेच्या कोणत्‍याही उपाययोजनांचे पालन होताना दिसत नाही. त्‍यामुळे पदपथावरून मार्गक्रमण करणाऱ्या नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्‍यता आहे. काही विक्रेत्यांकडे रात्रीच्या सुमारास दारू पिऊन खाण्यासाठी येणार्‌यांची गर्दी होत असून महिलांच्या छेडछाड व हाणामारीचे प्रकारही होत असतात. त्यामुळे कोपरखैरणे पोलिसांनी आपल्या क्षेत्रातील अवैधरीत्या व विनापरवाना सुरू असलेले वडापाव, चायनीज व इतर विक्रेत्यांचा शोध घेत कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: मुंबईकरांच्या लाईफलाईनमध्ये पुन्हा राडा! प्रवाशांमध्ये जोरदार हाणामारी, लाथाबुक्क्यांनी मारहाण करत...; घटनेचा व्हिडिओ व्हायरल

आजचे पंचांग 17 जुलै 2026! राहुकाल, शुभ मुहूर्त, चंद्रबळ आणि दिनविशेष

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान मोदींनी देशातील पहिल्या हायड्रोजन ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला.

Jalgaon Railway Flyover Update : जळगावला आणखी दोन रेल्वे उड्डाणपुलांची चाहूल? 'या' प्रकल्प मार्गावर होऊ शकतो पूल; रेल्वे विभागाकडून महापालिकेत प्राथमिक चाचपणी

बाबो! स्वप्नील जोशीने घेतली ६५ लाखांची टेस्ला; भावनिक पोस्टनं जिंकली चाहत्यांची मनं

SCROLL FOR NEXT