Mumbai esakal
मुंबई

Mumbai: तिचे चुंबन घेण्याचा...कोरियन यूट्यूबरचा लाईव्ह व्हिडीओदरम्यान विनयभंग

कोरियन यूट्यूबरचा लाईव्ह व्हिडीओदरम्यान विनयभंग

सकाळ डिजिटल टीम

मुंबई येथे धक्कादायक प्रकार घडला असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईच्या खारमध्ये एका युट्युबरचा लाईव्ह व्हीडिओदरम्यान विनयभंग करण्यात आला. ही माहिती युट्युबरच्या फॉलोअरने मुंबई पोलिसांना दिली. ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (streamer from Korea was harassed by these boys in Khar last night mumbai )

यूट्युबरच्या फॉलोअरनं मुंबई पोलिसांना टॅग करत व्हिडीओसह ट्विट केले आहे. सुमोटो तक्रार दाखल करत पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलं.

नेमकं काय घडलं?

ही घटना दोन दिवसांपूर्वीची आहे. ही प्रसिद्ध युट्यूबर आहे. भारतातील विविध ठिकाणी लाईव्ह स्ट्रिमिंग करत असते. तशीच एक लाईव्हा स्ट्रिमिंग करण्यासाठी काल ती खारच्या रोड क्रमांक ५ वर आली होती. त्या ठिकाणी ती लाईव्ह स्ट्रिमिंग करत असताना ती दोन तरुणांची प्रतिक्रिया घेण्यासाठी गेली होती. त्यावेळी या दोन तरुणांनी तिला ओढण्याचा, तिचे चुंबन घेण्याचा, तिला गाडीवर बळजबरीने बसवण्याचा प्रयत्न केला. हे सगळं लाईव्ह सुरू होत.

ही तरुणी घटनास्थळावरुन दूर जाऊ लागल्यानंतर तोच तरुण आपल्या एका मित्रासह बाईकवरुन पुन्हा तिच्या दिशेने आला आणि तिला जिथे जायचं आहे सोडण्याची ऑफर दिली. मात्र तिने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले.

हे ही वाचा: भारतीय उत्पादनांच्या खरेदीतली वाढ बनवेल देशाला आर्थिक महासत्ता...

तिच्या एका फॉलोअर्सने तो व्हिडीओ मुंबई पोलिसांना ट्विट केला. आणि कारवाईची मागणी केली. यानंतर तत्काळ खार पोलिसांनी सुमोटो तक्रार दाखल केली आहे. त्या तरुणीशीदेखील पोलिसांनी संपर्क साधला आहे. या प्रकरणाचे दोन आरोपी आहेत ते बांद्रा येथील आहेत. त्या दोन्ही तरुणांना रात्रीच अटक करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Shivaji Patil : गोकुळच्या रणधुमाळीत सतेज पाटील, शिवाजीराव पाटलांच्या घरी; महायुतीत नाराजीचा ‘वेध’ घेतल्याची चर्चा

Ichalkaranji Politics : इचलकरंजीचं राजकारण तापणार! प्रकाश आवाडे थेट लोकसभेच्या रिंगणात? खासदार माने गटाची वाढली धडधड, 'त्या' वक्तव्यानं वाढवलं टेन्शन

US H1B Visa: अमेरिकेचा H1B झटका! १ लाख ३ हजार डॉलर अतिरिक्त शुल्कामुळे नोकऱ्या परदेशात जाण्याची भीती

Marathi News Live Updates : ई-चलनाविरोधातील आमरण उपोषण तात्पुरते स्थगित; दोन आठवड्यांत निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा

Birth Death Registration Rules : जन्म-मृत्यू नोंदीला दोन वर्षे विलंब, तर न्यायालयाचे दार ठोठावे लागणार; केंद्राचे नवे कडक नियम लागू, गैरप्रकार रोखण्यासाठी पाऊल

SCROLL FOR NEXT