Water Supply  esakal
मुंबई

Water Supply : शनिवारी कुलाबा, कोळीवाडा आणि नौदल परिसराचे पाणी बंद

चर्चगेट येथील जीवन विमा मार्गावर मेट्रो ३ चे काम सुरू असताना १२०० मिलीमीटर व्‍यासाच्‍या मुख्‍य जलवाहिनीला गळती लागली आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - चर्चगेट येथील जीवन विमा मार्गावर मेट्रो ३ चे काम सुरू असताना १२०० मिलीमीटर व्‍यासाच्‍या मुख्‍य जलवाहिनीला गळती लागली आहे. या जलवाहिनीची येत्या शनिवारी ११ मे रोजी दुपारी ३.३० ते रात्री ११.३० या ८ तासांच्या कालावधीत दुरुस्ती करण्यात येणार आहे. या कारणामुळे सदर ८ तासांच्या कालावधीत कुलाबा, कोळीवाडा आणि नौदल परिसरास होणारा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. नौदलास रात्री होणारा पुरवठा हा दुरुस्तीनंतर म्हणजेच विलंबाने पुरवण्यात येईल असे पालिकेने कळविले आहे.

क्रॉस मैदान बोगद्यातून १५०० मिलीमीटर व्‍यासाच्‍या जलवाहिनीद्वारे पुढे १२०० मिलीमीटर व्‍यासाच्‍या जलवाहिनीचा उपयोग केला जातो. या जलवाहिनीवरुन होणारा पुरवठा हा कमी दाबाने तसेच कमी प्रमाणात होत असल्याचे आढळल्यानंतर शोध घेण्यात आला. त्यावेळी, मंत्रालय इमारतीजवळ जीवन विमा मार्ग येथे मेट्रो ३ चे काम सुरू असताना या १२०० मिलीमीटर व्‍यासाच्‍या जलवाहिनीस गळती झाल्‍याचे निदर्शनास आले.

त्यानंतर महानगरपालिकेच्या तातडीच्या दुरूस्‍ती विभागाने घटनास्‍थळी पाहणी केली. सदर जलवाहिनीची ही गळती लवकरात लवकर दुरुस्त करावी लागणार आहे, अन्यथा गळतीमुळे पाणी वाया जाण्यासह रस्ता खचण्याचा धोका देखील निर्माण होवू शकतो. सदर गळतीच्या दुरूस्‍तीसाठी सुमारे ७ ते ८ तासांचे अलगीकरण करावे लागणार आहे, असल्याचे पालिकेच्या जलअभियंता विभागाने सांगितले.

मरीन ड्राइव्ह वाहतूक पोलिसांनी ११ मे रोजी सदर जलवाहिनीच्‍या दुरूस्तीच्या कामाला परवागी दिली आहे. पालिकेच्‍या जलअभियंता खाते अंतर्गत तातडीच्या दुरूस्‍ती विभागाने (ईआरसी) शनिवारीच ३.३० ते रात्री ११.३० या ८ तासांच्या कालावधीत दुरूस्‍ती कामे हाती घेण्‍याचे निश्चित केले आहे. त्यासाठी सकाळी ९ वाजेपासून खोदकाम सुरु केले जाईल.

तर जलवाहिनीतील पाणी उपसा करुन नंतर प्रत्यक्ष दुरुस्तीचे काम दुपारी ३.३० वाजेपासून केले जाईल. तोवर संबंधित भागातील सकाळ व दुपार सत्रातील पाणीपुरवठा दिला जाईल. दुपारी ३.३० ते रात्री ११.३० या ८ तासांच्या प्रत्यक्ष दुरुस्ती कालावधीत कुलाबा (नियमित पाणीपुरवठा वेळ- सायंकाळी ४.३० ते सायंकाळी ६.३०), कोळीवाडा अतिरिक्त विशेष पाणीपुरवठा वेळ- सायंकाळी ६.३० ते सायंकाळी ६.४५ आणि नौदल अतिरिक्त विशेष पाणीपुरवठा वेळ– ६.५० ते सायंकाळी ७.०५ या परिसरांना होणारा पाणीपुरवठा पूर्णत: बंद राहणार आहे.

तसेच, नौदलास रात्री १०.३० ते पहाटे २.५० या कालावधीत केला जाणारा नियमित पाणीपुरवठा हा दुरूस्‍ती काम पूर्ण झाल्यानंतर, जलवाहिन्या भारीत (चार्जिंग) करुन त्यानंतर म्हणजेच नियमित पाणीपुरवठ्याच्या तुलनेत विलंबाने होईल, असे पालिकेने कळविले आहे. त्यामुळे पाणी जपून वापरावे असेआवाहनही पालिकेने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT