मुंबई

लालबाग सिलिंडर स्फोट दुर्घटना | आणखी एकाचा मृत्यू, तिघांची प्रकृती गंभीर

भाग्यश्री भुवड

मुंबई : लालबाग गणेश गल्ली येथील तळ अधिक चार मजली इमारतीच्या एका घरात गॅस गळती होऊन रविवार 6 डिसेंबरला स्फोट झाला. या दुर्घटनेत केईएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या आणखी एकाचा मृत्यू झाला. यामुळे मृतांचा आकडा 6 वर पोहोचला आहे. 

लालबाग, गणेश गल्ली येथील साराभाई इमारतीतील एका घरात गॅस गळतीमुळे 6 डिसेंबरला सिलिंडरचा स्फोट झाला आणि त्याच दिवशी संध्याकाळी दोघांचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या दिवशी एकाचा तर शुक्रवारी दोघांचा मृत्यू झाला होता. तर आज विनायक शिंदे (57) यांचा केईएम रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 6 झाल्याचे पालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्याने सांगितले. 


दरम्यान, या दुर्घटनेत जखमी झालेल्यांपैकी 6 जण दगावले असून 3 जणांची प्रकृती गंभीर आहे. तर तीन जखमींच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. तर भायखळा येथील मसीना रुग्णालयात दाखल चारही जणांची प्रकृती गंभीर असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. 

दोघांना शिफ्ट करण्याची प्रक्रिया - 

दोन रुग्णांना खासगी मसीना रुग्णालयात शिफ्ट करण्याची सध्या प्रक्रिया सुरू आहे. त्यांनी तशी विनंती केली होती. आता सध्या तिघांवर उपचार सुरू आहेत. त्यातही एकाची परिस्थिती चिंताजनक असून ते 80 टक्के भाजले आहेत. बाकी दोघे 30 ते 35 % भाजले आहेत. आज दुपारच्या दरम्यान एकाचा मृत्यू झाला आहे.

डाॅ. हेमंत देशमुख,
अधिष्ठाता, केईएम रुग्णालय

0--------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fake Cancer Medicines Racket : कॅन्सरच्या बनावट औषधांचे मोठे रॅकेट उघड; ९० हून अधिक रुग्णालयांना पुरवठ्याचा संशय

Maratha Reservation: मराठा आरक्षणावर शिवेंद्रसिंहराजेंचा मोठा दावा; ‘तोंडाला पाने पुसणारे नव्हे, न्यायालयात टिकणारे आरक्षण देणार’

Kundan Sankhe Arrested : पालघर रिलीफ रुग्णालय राडा प्रकरण; निलंबित शिवसेना जिल्हाप्रमुखासह आठ जणांची पोलिसांसमोर शरणागती, राहुल घरतसह 22 जणांना पोलिस कोठडी

Marathi News Live Updates : पुण्यातील मानाचा चौथा श्री तुळशीबाग गणपती आगमन मिरवणुकीला सुरुवात

लालबागचा राजाचं दर्शन घ्यायचंय? जाणून घ्या पूजा आणि आरतीची वेळ, पाहा LIVE VIDEO

SCROLL FOR NEXT