lalbaug flyover bike accident two killed police register case esakal
मुंबई

Mumbai News : लालबाग उड्डाणपुलावर अपघातात दोघांचा मृत्यू; पोलीसांकडून गुन्ह्याची नोंद

मुंबईतील लालबाग उड्डाणपुलावर दुचाकीच्या अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री नोंदवण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईतील लालबाग उड्डाणपुलावर दुचाकीच्या अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री नोंदवण्यात आली आहे. ऋषीकेश सालकर व शैलेश सैद अशी मृतांची नावे असून दोघेही साकीनाका येथील रहिवासी आहेत.

मोटरबाईक उड्डाणपुलावरील रस्त्याच्या संरक्षक भींतीवर धडकल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. याप्रकरणी भरधाव वेगाने दुचाकी चालवूनमृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकीस्वाराविरोधात काळाचौकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लालबाग उड्डाणपुलावर अपघात झाल्याची माहिती काळाचौकी पोलिसांना मिळताच पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी पुलाच्या संरक्षण भींतीवरील लोखंडी रोलिंगला एक व्यक्ती अडकली होती. दुसरी व्यक्ती रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेली दिसली. पोलिसांनी तात्काळ अडकलेल्या व्यक्तीला खाली काढले.

दोघांनाही जे.जे. रुग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरांनी त्यांची तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार दुचाकी भरधाव वेगाने चालवत पुलाच्या दिशेने गेले होते. वेगामुळे वाहनावर नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी काळाचौकी पोलीस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT