Lalbaugcha Raja Visarjan Esakal
मुंबई

Lalbaugcha Raja Visarjan: लाडक्या लालबागच्या राजाला 22 तासांनी निरोप, हायड्रॉलिक्सचा वापर करत राजाचं केलं विसर्जन

राज्यभरात कालपासून गणरायाच्या विसर्जनाची धामधूम पाहायला मिळाली

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्यभरात कालपासून गणरायाच्या विसर्जनाची धामधूम पाहायला मिळाली. लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविकांनी ठिकठिकाणी मोठी गर्दी केली. राज्यभरात ढोल ताशांच्या गजरात बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. आज 10 दिवसांच्या पाहुणचारानंतर लालबागचा राजाला गिरगाव चौपाटीवर निरोप देण्यात आला. लाडक्या राजाला निरोप देण्यासाठी मोठा जनसागर लोटला होता. (Latest Marathi News)

तब्बल 22 तासांच्या मिरवणुकीनंतर अखेर लालबागचा राजा गिरगाव चौपाटीला पोहोचला.

लालबागचा राजा गिरगाव चौपाटीला येताच भाविकांनी मोठी गर्दी केली. लालबागच्या राजावर फुलांची उधळण करण्यात आली. राजाची मिरवणूक येताच गिरगाव चौपाटीवरील भाविकही बाप्पाच्या मिरवणुकीत सामील झाले. त्यानंतर हळूहळू ही मिरवणूक समुद्राच्या दिशेने निघाले. बाप्पाला तराफात बसवले. त्यानंतर बाप्पाची मनोभावे पूजा करण्यात आली.

सकाळी नऊ वाजता लालबागचा राजा गिरगावच्या समुद्रात विसर्जित झाला. राजाला निरोप देण्यासाठी यावेळी भाविकांचा जनसागर लोटला होता. जवळपास 22 तासांच्या मिरवणुकीनंतर राजाला निरोप देण्यात आला.

दरम्यान आज सकाळी आठच्या सुमारास लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर पोहोचला होता. मात्र, सकाळी समुद्राला ओहोटी असल्याने विसर्जनसाठी आलेले लालबागच्या राजासह अनेक गणपती रांगेतच होते. समुद्राला भरती आल्यानंतर लालबागचा राजाला तराफ्यावर ठेवण्यात आलं. आरती करण्यात आली आणि त्यानंतर विसर्जनासाठी समुद्राकडे मार्गस्थ करण्यात आलं. (Marathi Tajya Batmya)

लालबागच्या राजाला कोळी बांधवांकडून दरवर्षीप्रमाणे बोटींची सलामी देण्यात आली. समुद्रात मध्यभागी लालबागचा राजा असलेला तराफा आणि आजूबाजूला कोळी बांधवांच्या बोटी होत्या. चौपाटीपासून काही अंतरावर आत अरबी समुद्रात जात लालबागच्या राजाचं विसर्जन झालं. पोलिसांचा मोठा बंदोबस्त या भागात तैनात करण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

IND vs WI, 3rd T20I: "विंडीजला हलक्यात घेऊ नका...", विजयानंतरही श्रेयस अय्यरची चिंता मिटेना; काय म्हणाला, वाचा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! उन्हाचा चटका वाढणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

SCROLL FOR NEXT