Lalit Patil Arrest 
मुंबई

Lalit Patil Arrest: "मी पळालो नाही तर मला पळवलं"; ललित पाटीलच्या दाव्यावर मुंबई पोलीस काय म्हणाले?

Sandip Kapde

Lalit Patil Arrest: मुंबई पोलिसांनी अखेर ड्रग्जच रॅकेट चालवणाऱ्या फरार आरोपी ललित पाटीलला अटक केली आहे. अमली पदार्थांच्या तस्करीचा आरोपी ललित पाटील २ ऑक्टोबर रोजी पुण्यातील ससून रुग्णालयातून फरार झाला होता. ललित पाटील याला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने चेन्नई, तामिळनाडू येथून अटक केली आहे. आतापर्यंत या प्रकरणात १५ आरोपींना अटक केली आहे.

रात्र उशीरा मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली. पुणे पोलीस शोधात असलेल्या आरोपीला मुंबई पोलिसांनी कशी अटक केली. यावर मुंबई पोलीस सहआयुक्त सत्यनारायण चौधरी म्हणाले तो आमच्या कारवाईचा भाग आहे.  सत्यनारायण चौधरी यांनी आज पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली.

मी पळालो नाही मला पळवण्यात आलं, असं ललित पाटील म्हणाला होता. यावर सत्यनारायण चौधरी म्हणाले, "ऑगस्टपासून आम्ही कारवाई करत आहोत. ड्रग्ज फ्री महाराष्ट्र मोहिमेअंतर्गत ही कारवाई केली. ललित ससून रुग्णालयातून पळाला याबाबत पुणे पोलीस चौकशी करतील. नाशिकमधील छाप्यानंतर आम्ही ललितच्या मागावर होतो."

आतापर्यंत या प्रकरणात कोणतेही राजकीय कवनेक्शन समोर आले नाही. पलायन प्रकरणी पुणे पोलीस अधिक तपास करतील, अशी माहिती मुंबई पोलीस सहआयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी दिली. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ichalkaranji Betting Case : आमदार राहुल आवाडेंचा कट्टर समर्थक नगरसेवक गोट्या पवारला ऑनलाइन बेटिंग प्रकरणात अटक, इचलकरंजी पोलिसांची कारवाई

Tata Tiago 2026 : पेट्रोल-CNG-EV एकत्रच लाँच; टाटाची सर्वात स्वस्त कार, सेफ्टी फिचर्सही वाढवली

"प्रयोग गेले, चित्रपट गेला आणि मी तोंडावर पडले" लक्ष्मीनिवास फेम अभिनेत्रीने सांगितला तिला आलेला विचित्र अनुभव

माकडामुळे गावात ६ दिवस लॉकडाऊनसारखी स्थिती, हल्ल्यात ७० जण जखमी; ५ ते ७ जण गंभीर

Panvel Flood Risk: पनवेलला पुराचा धोका? विमानतळासाठी भराव, बदललेल्या नदीपात्रामुळे संकट ओढावण्याची भीती

SCROLL FOR NEXT