कार्यशाळेत दीपप्रज्वलन करताना मान्यवर 
मुंबई

अभ्यासू वृत्तीने उद्योग क्षेत्रात उतरा

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : नवउद्योजकांनी उद्योग उभारताना केवळ आपल्या परीने विचार न करता, उद्योग क्षेत्राला कशाची आवश्‍यकता आहे, त्यांच्या अडचणी काय आहेत, याचा विचार व अभ्यास करणे गरजेचे आहे; तरच त्यांना नवा उद्योग उभारता येईल. त्यामुळे नवउद्योजकांनी त्या-त्या क्षेत्रातील लोकांशी संवाद साधण्याबरोबरच त्यांच्यात जाऊन काम करून अनुभव घेणे आवश्‍यक आहे, असे प्रतिपादन अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्त पल्लवी दराडे यांनी वाशी येथे केले.  

मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री आणि दलित इंडियन चेम्बर्स ऑफ कॉमर्स ॲन्ड इंडस्ट्री (डिक्की) मुंबई विभागाच्या वतीने फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमधील उद्योजकांसाठी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्‌घाटन राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्त पल्लवी दराडे यांच्या हस्ते झाले. यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी डिक्कीचे फाऊंडर चेअरमन पद्मश्री मिलिंद कांबळे, कामत ग्रुप ऑफ हॉटेल्सचे संस्थापक डॉ. विठ्ठल कामत, कोकण भूमी प्रतिष्ठानचे संजय यादवराव, डॉ. अशोक करोंजकर, निश्‍चय शेळके, राजा नायक, संतोष कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.  

डिक्कीच्या कार्याचे कौतुक
डिक्कीने उद्योजकांना केवळ प्रोत्साहन देण्याचे काम केले नाही; तर युवकांना यात सहभागी करून घेण्याचे मोठे काम केल्याचे सांगून पल्लवी दराडे यांनी डिक्कीच्या कार्याचे कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Indians Playoff Scenario: ८ सामने, ६ पराभव! मुंबई इंडियन्स प्ले ऑफमध्ये कसे पोहोचणार? हैदराबादने केले चारीमुंड्या चीत

MI vs SRH Live: मुंबई इंडियन्सकडून भली मोठी चूक; अंबानी झाले 'शॉक'! ट्रॅव्हिस हेडने त्यानंतर जे केलं, ते पाहून अख्खं स्टेडियम शांत

Property Tax : मिळकतकर चुकविणारे रडारवर; ५०० मालमत्तांवर जप्तीची टांगती तलवार; १० मेपासून धडक मोहीम

Shirur Traffic Drive: काळ्या काचा व फॅन्सी नंबरप्लेटला शिरूर पोलिसांचा चाप; दिवसभरात २९ वाहनांवर दंडात्मक कारवाई

Mumbai: पावसाळापूर्व नालेस्वच्छता ३१ मे पर्यंत पूर्ण करा, अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश

SCROLL FOR NEXT