Lashkar-e-Tayyiba threatens to attack Mount Mary Church in Mumbai esakal
मुंबई

Mount Mary Church : मुंबईतील माऊंट मेरी चर्चवर लष्कर-ए-तैय्यबाकडून हल्ल्याची धमकी

मुंबईतील माऊंट मेरी चर्चला बॉम्ब ठेवण्याची धमकी देण्यात आल्यची माहिती समोर आली

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईतील माऊंट मेरी चर्चला बॉम्ब ठेवण्याची धमकी देण्यात आल्यची माहिती समोर आली आहे. शुक्रवारी लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेने ईमेलद्वारे चर्चमध्ये बॉम्बस्फोट करण्याची धमकी दिली आहे.

पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दहशतवादी संघटना चर्चवर बॉम्बद्वारे हल्ला करणार असल्याचा इशारा ई-मेलद्वारे देण्यात आला आहे. पोलिसांनी भादंवि कलम 505 (3) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

माउंट मेरी चर्च हे भारतातील पाच सर्वात जुन्या चर्चपैकी एक आहे. अशातच नाताळनंतर (Christmas) आता आलेल्या या धमकीमुळे पोलिस अॅक्शन मोडवर आल्याचं पहायला मिळतंय.

दरम्यान, नाताळ ते न्यू ईयरच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात लोक या चर्चेमध्ये येतात. त्यामुळे या काळात मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. अशातच आता दहशदवादी संघटनेच्या धमकीमुळे आता पोलीस यंत्रणा दक्षता घेत आहे.

ख्रिसमसच्या दिवशी मुंबईत नाताळची धूम पहायला मिळाली होती. अशातच आता न्यू ईयरच्या सिलेब्रेशनला गालगोट लागू नये, म्हणून पोलीस यंत्रणा काळजी घेताना दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder 5 KG पाच किलो एलपीजी सिलिंडरबाबत नवा नियम, खरेदीसाठी ओळखपत्र बंधनकारक

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

SCROLL FOR NEXT