MHT-CET
MHT-CET 
मुंबई

विद्यार्थ्यांनो...! MHT-CET परिक्षेसाठी अर्ज करण्याची ही अखेरची मुदतवाढ

सकाळवृत्तसेवा

मुंबई : एमएचटी सीईटी परीक्षेसाठी अर्ज भरण्याची मुदत संपल्याने विद्यार्थी आणि पालकांनी नव्याने नोंदणी आणि अपूर्ण अर्ज भरण्यासाठी संधी देण्याची विनंती सीईटी सेलकडे केली होती. त्याची दखल घेत सीईटी सेलने विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याची अखेरची संधी दिली असून, त्यासाठी 1 जूनपर्यंत मुदत दिली आहे.

कोरोना महामारीमुळे राज्य सामायिक परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) अनेक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमांतील प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी होणारी एमएचटी सीईटी पुढे ढकलण्यात आली आहे. या प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाईन नोंदणी करण्यास मुदतवाढ द्यावी, अशी मागणी विद्यार्थी संघटनांकडून होत होती. 7 मार्चपर्यंत अपूर्ण अर्ज भरलेल्या 6418 विद्यार्थ्यांना अर्ज पूर्ण करून शुल्क भरण्यासाठी सीईटी सेलने यापूर्वी 23 मेपर्यंत मुदत दिली होती.

सीईटी सेलने या कालावधीत एमएचटी सीईटी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार जुलै व ऑगस्ट महिन्यांत प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. अर्ज भरण्यात अडचणी आल्याने अनेक विद्यार्थ्यांनी मुदतवाढ मागितली होती. त्यानुसार सीईटी सेलने नवीन नोंदणी अर्ज भरणे, अपूर्ण राहिलेले अर्ज पूर्ण भरणे आणि शुल्क भरण्यास मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना 26 मे ते 1 जून या कालावधीत अर्ज भरता येईल. या प्रक्रियेबाबतची माहिती सीईटी सेलच्या संकेतस्थळावर मिळेल. यानंतर पुन्हा मुदतवाढ देण्यात येणार नसल्याचे सीईटी सेलने स्पष्ट केले आहे.

This is the last extension to apply for MHT-CET exam

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT