Usha-Khanna 
मुंबई

उषा खन्ना यांना मंगेशकर पुरस्कार

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई - महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे देण्यात येणारा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ संगीतकार उषा खन्ना यांना जाहीर करण्यात आला आहे. पाच लाख रुपये, मानपत्र, स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखालील पुरस्कार निवड समितीने सन 2019 - 20 साठीच्या पुरस्कारासाठी ही निवड केली.

उषा खन्ना यांचा जन्म 7 ऑक्‍टोबर 1941 रोजी झाला. भारतीय चित्रपट सृष्टीतील मोजक्‍या महिला संगीतकारांपैकी त्या आहेत. 'दिल देके देखो'' या 1959 मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटापासून त्यांनी संगीत दिग्दर्शनाच्या कारकिर्दीला सुरवात केली. त्यानंतर बिन फेरे हम तेरे, लाल बंगला, सबक, हवस, हम हिंदुस्थानी, आप तो ऐसे ना थे, साजन बिना सुहागन, साजन की सहेली, अनोखा बंधन, शबनम, सौतन, आओ प्यार करे यांसारख्या अनेक चित्रपटांना त्यांनी संगीत दिले. त्यांनी अनेक नवीन गायकांना गाण्याची संधी दिली. त्यांनी काही मालिकांसाठीही संगीत दिग्दर्शन केले. "दिल परदेसी हो गया' हा 2003 मध्ये प्रदर्शित झालेला त्यांचा शेवटचा चित्रपट.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

उद्धव ठाकरेंची शिवसेना पुन्हा संकटात! काही खासदार दुसरा गट स्थापन करणार? लोकसभा अध्यक्षांना पत्र देणार, राऊत दिल्लीला रवाना

India-Pakistan Petrol-Diesel: पाकिस्तानात सलग 5 वेळा पेट्रोल-डिझेल दरकपात, भारतात मात्र 4 वेळा दरवाढ; नेमकं कारण काय?

कोल्हापुरात टक्केवारीची कीड! कंत्राटात ५६ टक्के आमदार, अधिकाऱ्यांना; लाचखोरीच्या आरोपांनी खळबळ

Latest Marathi News Live Update : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 17 जूनला होणार

Ravi Shastri:"विराट कोहली 'अहंकारी आणि बिघडलेला मुलगा'? रवी शास्त्रींनी केला मोठा खुलासा; म्हणाले, तो फक्त मैदानातच..."

SCROLL FOR NEXT