मुंबई

राम मंदिराचं मोठं श्रेय लालकृष्ण अडवाणी आणि बाळासाहेब ठाकरे यांना, लतादीदींनी केलं ट्विट...

सुमित बागुल

मुंबई : अयोध्येत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचं भूमिपूजन पार पडलं. आज पार पडलेल्या भूमिपूजन सोहळ्यानिमित्ताने देशभरात आनंदाचं वातावरण आहे. खरंतर कोरोनाच्या सावटाखाली अत्यंत मोजक्या मान्यवरांच्या उपस्थित आजचा राम मंदिर भूमिपूजन सोहळा पार पडला. आजच्या राम मंदिर भूमिपूजनाच्या निमित्ताने गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांनी एक ट्विट करत आनंद व्यक्त केलाय.   

ट्विटमध्ये काय म्हणाल्यात लता मंगेशकर : 

"नमस्कार.कई राजाओं का, कई पीढ़ियों का और समस्त विश्वके राम भक्तोंका सदियों से अधूरा सपना आज साकार होता दिख रहा है. कई सालों के वनवास के बाद आज अयोध्या में प्रभु श्रीराम के मंदिर का पुनर्निर्माण हो रहा है , शीलन्यास हो रहा है. इसका बहुत बड़ा श्रेय माननीय लालकृष्ण अडवाणी जी को जाता है, क्यों के उन्होंने इस मुद्दे को लेकर रथ यात्रा करके पूरे भारत में जनजागृति की थी,और श्रेय माननीय बालासाहेब ठाकरे जी को भी जाता है.

आज इस शीलान्यास का बहुत बड़ा आयोजन हो रहा है उसमें माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी, आरएसएस के सरसंघ चालक माननीय मोहन भागवत जी , उत्तर प्रदेश की राज्यपाल श्रीमती आनंदीबेन पटेल जी और राम जन्मभूमि न्यास अध्यक्ष नृत्य गोपाल दास जी , उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री माननीय योगी आदित्यनाथ जी और कई गणमान्य व्यक्तित्व उपस्थित होंगे.आज भलेही करोना की वजह से लाखों रामभक्त वहाँ पहुँच नहीं पाएँगे परंतु उनके मन और ध्यान श्रीराम के चरणों में ही होंगे.मुझे ख़ुशी है की ये समारोह माननीय नरेंद्रभाई के करकमलोंसे होरहा है. आज मैं,मेरा परिवार और पूरा संसार बहुत खुश है और मानो आज हर धड़कन हर साँस कह रही है जय श्रीराम।"

याच मोठं श्रेय हे लालकृष्ण अडवाणी यांना जातंय

गेल्या अनेक पिढ्यांपासून राम मंदिरासाठी लढा सुरु आहे. आज भूमिपूजनाच्या कार्यक्रमांच्या निमित्ताने गेल्या अनेक पिढ्यांचे, राज्यकर्त्यांचे आणि जगभरातील राम भक्तांचं अपूर्ण स्वप्न आज पूर्णत्वास येताना पाहायला मिळतंय. अनेक वर्षांच्या वनवासानंतर आज अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मंदिराच्या पुनर्निर्माणाचं काम होतंय. कोनशिला बसवली जातेय. याच मोठं श्रेय हे लालकृष्ण अडवाणी यांना जातंय. कारण लालकृष्ण अडवाणी यांनी संपूर्ण देशभरात रथयात्रेच्या माध्यमातून जनजागृती केली. सोबतच याचं श्रेय बाळासाहेब ठाकरे यांनादेखील जातं.

आज या भूमिपूजनाच्या कार्यक्रमास भारताचे पंतप्रधान नरेंद मोदीजी, सरसंघचालक मोहन भागवतजी, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल श्रीमती आनंदीबेन पटेलजी, राम जन्मभूमी न्यासाचे अध्यक्ष  नृत्य गोपाल दासजी, उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री आदित्यनाथजी आणि अनेक महत्त्वाची व्यक्तिमत्व उपस्थित असतील. आज भलेही कोरोनामुळे लाखो राम भक्त तिथं पोहोचू शकणार नाहीत, मात्र त्यांचं ध्यान आणि मन श्रीरामांच्या चरणीच असेल. नरेंद्र मोदींच्या हातानी आजचा कार्यक्रम पार पडला याचा मला आनंद आहे. आज मी, माझं कुटुंब आणि संपूर्ण जग आनंदी आहे आणि प्रत्येक श्वास आणि हृदयाचा ठोका जय श्रीराम म्हणतोय, असं लता मंगेशकर म्हणालात. 

Lata mangeshkar tweets gave credit ram mandir to L K advani and balasaheb thackeray

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil : राष्ट्रवादीच्या नाशिकच्या शिबिरात जयंत पाटलांचा गोंधळ! शिबिराकडे हवनाऐवजी वळले अन्...

Mobile Recharge Rules : फोनला रिचार्ज नसल्यास सिमकार्ड किती दिवस काम करते? खूप महिने बंद राहिल्यास काय होते, जाणून घ्या सर्व काही

Mangalwedha Rain : मंगळवेढ्यात सततच्या पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान, शेतकऱ्यांची चिंता वाढली

Godavari Flood: गोदावरी नदीत जायकवाडी धरणातून पाणी विसर्ग; गेवराई तालुक्यातील बत्तीस गावांचा संपर्क तुटला

Latest Marathi News Updates: धाराशिव मध्ये रात्रभर जोरदार पाऊस, तेरणा नदीला पुराचा धोका

SCROLL FOR NEXT