Ambadas Danve letter to nilam gorhe  sakal
मुंबई

Ambadas Danve: माझ्या निलंबनाचा फेरविचार करावा, दानवेंनी लिहिलेलं पत्र झालं व्हायरल

Vidhanparishad Session Rain 2024: अंबादास दानवे यांनी विधान परिषद अध्यक्ष नीलम गोऱ्हे यांना पत्र लिहून दिलगिरी व्यक्त केली असून माझं निलंबन मागे घ्यावं अशी विनंती केली आहे.

Chinmay Jagtap

Ambadas Danve Suspendend : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. यातच विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आमदार प्रसाद लाड यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करत शिवीगाळ केली असा आरोप भाजपने केला होता. यानंतर विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना पाच दिवसांसाठी निलंबित करण्यात आलं होतं.

आता अंबादास दानवे यांनी विधान परिषद अध्यक्ष नीलम गोऱ्हे यांना पत्र लिहून दिलगिरी व्यक्त केली असून माझं निलंबन मागे घ्यावं अशी विनंती केली आहे. त्यांनी लिहिलेलं पत्र समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल देखील होत आहे.

यावेळी पत्रामध्ये अंबादास दानवे यांनी लिहिलं आहे की, सोमवार दिनांक १ जुलै, २०२४ रोजी विधानपरिषद सभागृहात झालेल्या घटनेनंतर मला मंगळवार, दिनांक २ जुलै, २०२४ रोजी आपण ५ दिवसांसाठी निलंबीत केले.

महोदया, मी सभागृहाचा सदस्य म्हणून आतापर्यंत सातत्याने सभागृहाचे पावित्र्य, नियम, प्रथा व परंपरा पाळण्याचा आटोकाट प्रयत्न केलेला आहे. परंतु दिनांक १ जुलै, २०२४ रोजी माझ्याकडून अनावधनाने घडलेल्या घटनेनंतर आपण मला निलंबित केले. सभापती महोदया, या संदर्भात आमच्या पक्षप्रमुखांनी जाहिरपणे दिलगीरी व्यक्त केली आहे, हे आपण जाणताच आणि माझीही भुमिका सभागृहाचे पावित्र्य कायम राहावे हीच आहे. त्यामुळे सभागृहाची दिलगिरी व्यक्त करण्याविषयी माझ्या मनात कोणतेही किंतू परंतू नाही.

सभागृहाचे कामकाज सुरु आहे, या स्थितीत महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी, तरुण व माता- भगिणींचे अनेक प्रश्न मला सभागृहात मांडायचे आहेत. जेणेकरुन सरकार त्या प्रश्नाला न्याय देईल, त्यामुळे माझे निलंबन म्हणजे शेतकरी, कष्टकरी, तरुण व माता-भगिणींचे प्रश्न सोडविण्यापासून मला थांबविणे असे होवू नये. या हेतूने माझ्या निलंबनाचा फेरविचार करावा, ही विनंती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Air Ambulance Crash: भीषण विमान दुर्घटना!,रांचीहून दिल्लीला निघालेली 'एअर अ‍ॅम्ब्यूलन्स' घनदाट जंगलात कोसळली

WI vs ZIM, T20 WC: वेस्ट इंडिजचा विजय अन् टीम इंडिया स्पर्धेबाहेर? झिम्बाब्वेविरुद्धच्या निकालाने सर्व गणित बिघडले, आता फक्त आणि फक्त...

Yavatmal News : जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या बदल्या एप्रिलमध्ये होणार; सीईओंचे गटविकास अधिकार्‍यांना पत्र

Congress spokesperson assaulted Video : काँग्रेस प्रवक्त्यास पुण्यात मारहाण!, प्रदेशाध्यक्ष सपकाळांनी ट्वीट केला घटनेचा व्हिडिओ

T20 WC, WI vs ZIM: ७ चौकार, ७ षटकार... वानखेडेवर हेटमायरचं वादळ; झिम्बाब्वेच्या गोलंदाजांना झोडपत विंडीजसाठी रचला वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT