मुंबई

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतली राज्यपाल कोश्यारी यांची भेट, आता

सकाळवृत्तसेवा

मुंबई, ता. 28: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी  राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची आज भेट घेतली. विधान परिषदेच्या 2 रिक्त जागांपैकी एका जागेवर मुख्यमंत्री  उद्धवजी ठाकरे यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मंत्री मंडळाची शिफारस त्यांनी राज्यपालांकडे केली आहे.

राज्य सरकार सध्या कोरोनाविरोधात लढा देत आहे. आमच्या सर्वांसह संपूर्ण यंत्रणा या लढ्यात सहभागी झाली आहे. काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार आज पुन्हा  विधान परिषदेच्या जागेबाबत मंत्रीमंडळ ठरावाचे पत्र महाविकास आघाडीच्या नेत्यांनी  राज्यपाल यांना सुपूर्द केले.

ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना सहा महिन्याच्या आत विधीमंडाळाच्या दोन्ही समगृहापैकी कोणत्याही एका सभागृहाचे सदस्य होणे संविधानातील तरतुदीनुसार बंधनकरक आहे.यानुसार ठाकरे यांना 27 मे पर्यत आमदार होणे बंधनकारक आहे.

यावेळी काँग्रेसचे मंत्री बाळासाहेब थोरात, अस्लम शेख,राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ, जयंत पाटील तर शिवसेनेचे एकनाथ शिंदे, अनिल परब उपस्थित होते.

leaders of mahavikas aaghadi met governor bhagatsingh koshyai

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

Delhi Bomb Threats: दिल्ली बॉम्बच्या धमक्यांचे दक्षिण कोरिया, फ्रान्स कनेक्शन; मेल डोमेन अन् वीपीएनबाबत धक्कादायक माहिती समोर

लग्नामुळे महिलेचे स्वातंत्र्य संपत नाही; तिला स्वतःच्या आवडीनुसार जगण्याचा पूर्ण अधिकार; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

Josh Baker: क्रिकेटविश्वात शोककळा! इंग्लंडच्या 20 वर्षीय खेळाडूचे निधन, काउंटी संघाने दिली माहिती

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी रायबरेलीतून, तर किशोरीलाल शर्मा अमेठीतून निवडणूक लढवणार; काँग्रेसची यादी जाहीर

SCROLL FOR NEXT