Eknath Shinde 
मुंबई

Eknath Shinde: सफाई कर्मचारी मुंबईचा खरा 'हिरो'; महास्वच्छता अभियानात एकनाथ शिंदेंचे स्तुतीसुमने

राज्य सरकार नवनवीन प्रकल्प करत आहेत. यामुळे प्रदुषण कमी होण्यास मदत होईल. पर्यावरणावर आपल्याला अधिक लक्ष द्यायचे आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

Sandip Kapde

Eknath Shinde:  मुंबईतील १० ठिकाणी आज महास्वच्छता अभियान राबवण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबोधित केले. राज्य सरकार नवनवीन प्रकल्प करत आहेत. यामुळे प्रदुषण कमी होण्यास मदत होईल. पर्यावरणावर आपल्याला अधिक लक्ष द्यायचे आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

एकनाथ शिंदे म्हणाले, हवा प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. मुंबईसह आता महाराष्ट्रात देखील स्वच्छता अभियान राबवणार आहोत. मुंबईत झाडे लावण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरु आहे. पालिका आयुक्तांना यासंदर्भात सूचना देण्यात आले आहेत. अर्बन फॉरेस्ट तयार करण्याच्या सुचना दिल्या आहेत.

सफाई कर्मचारी मुंबईचा खरा हिरो आहे. त्यांच्या वसाहतीत देखील आम्ही गेलो. त्यात देखील आम्ही सुधारणा करणार आहोत, त्यांच्या इन्शुरन्स बंद करण्यात आला होता, तो आपण सुरु केला आहे, असे शिंदे म्हणाले. (Latest Marathi News)

उद्धव ठाकरे यांच्यावर टीका-

आम्ही जुहू बीचवर आम्ही गेलो होतो. त्यावेळी आमच्यावर टीका करण्यात आली. लोक म्हणाले मुख्यमंत्री त्या बीचवर मुख्यमंत्री ट्रॅक्टर चालवतात. पण तो ट्रॅक्टर नव्हता. तो बीच कॉम्पर होता. तो बीचवरील दगड, वाळू वेगळ करण्याचं काम करतो. त्यांनी थोडी माहिती घ्यायला हवी होती. चहल त्यांना माहिती देत नाहीत. ऑन फिल्ड गेल्यानंतर सर्व माहीती मिळते, असे एकनाथ शिंदे म्हणाले.  

२२ तारखेला मुंबईत दिवाळी साजरी करा, अशा सुचना मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांना दिल्या. सगळीकडे रोषणाई करा. राम मंदिर व्हावं हे बाळासाहेबांचं स्वप्न होतं, असे शिंदे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT