मुंबई

पोलिस भरतीमध्ये मराठा समाजासाठी जागा आरक्षित ठेवण्याविषयी कायदेशीर सल्ला घेणार; गृहमंत्री अनिल देशमुख

तुषार सोनवणे

मुंबई- राज्य सरकारने जाहीर केलेल्या साडेबारा हजार पोलिस भरतीमध्ये मराठा समाजासाठी १३ टक्के आरक्षणाच्या जागा  बाजूला ठेवून भरती प्रक्रिया सुरू करण्याविषयी कायदेशीर सल्ला घेतला जाईल असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जाहीर केले. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या कायद्याला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने पोलीस भरतीमध्ये मराठा समाजावर अन्याय होणार असल्याची तीव्र प्रतिक्रिया मराठा समाजाच्या आंदोलकांमध्ये उमटल्यानंतर त्यावर अनिल देशमुख यांनी मार्ग काढण्याचे आश्वासन दिले.

मराठा समाजाचे आरक्षण टिकवण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असून  त्यामध्ये सरकारला नक्की यश मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  राज्यातील पोलीस भरतीत मराठा समाजावर अन्याय होणार नाही यासाठी काळजी घेतली जाईल. मराठा समाजासाठी 13 टक्के जागा बाजूला काढण्यासाठी कायदेशीर बाबीही तपासणार असल्याचेही अनिल देशमुख यांनी सांगितले.
दरम्यानच्या काळात राज्य सरकारने 12 हजार 500 पोलिसांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र मराठा समाजाच्या आरक्षणाच्या कायद्याला स्थगिती आली असल्याने पोलीस भरतीमध्ये मराठा समाजाला संधी नाकारली जाणार असल्याचा आरोप आ. विनायक मेटे यांनी केला आहे.

-------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB VS KKR LIVE: विराट कोहलीची पहिली धाव अन् सेलिब्रेशन जणू Century सारखं, चाहत्यांना हसू आवरेना... Viral Video ची मजेशीर गोष्ट

Milk Rate Hike: महागाईचा आणखी एक फटका! अमूलनंतर मदर डेअरीनेही दूध दर वाढवले, किती रुपयांनी? बजेट कोलमडणार

Shivprasad Chimpanti : ...अन् त्याच्या जिद्दीसमोर अपंगत्वही हरलं! बोलता-चालताही येईना, गुण मिळवले ६६ टक्के

धक्कादायक! नववीतील विद्यार्थिनीचा शिक्षकाने केला विनयभंग; जामीन मिळाल्यानंतर ‘या’ शाळेने त्याला पुन्हा दिली संधी, अकरावीत शिकणाऱ्या पीडितेला भीती

RCB VS KKR LIVE: विराट कोहलीच्या विक्रमी सामन्यात अंगकृश रघुवंशी चमकला... रिंकू सिंगसह गतविजेत्यांसमोर ठेवले तगडे लक्ष्य

SCROLL FOR NEXT