Corona Fight sakal media
मुंबई

मुंबईत तीन प्रभागात कोविडचा विळखा सैल, रुग्णवाढ एकेरी अंकात

- समीर सुर्वे

मुंबई : लालबाग परळसह भायखळा मरीनलाईन्स परीसरात (Mumbai corona) गेल्या आठवडाभरापासून कोविड रुग्णवाढ (corona new patients) ऐकेरी अंकात नोंदवली जात आहे. एफ दक्षिण,बी आणि सी प्रभागातील रुग्णदुप्पट होण्याचा कालावधीही सर्वाधिक आहे. मरीनलाईन्स,चर्निरोडचा,सॅन्डहर्स्ट रोड तसेच लालबाग परळ (lalbaug-parel) हा चाळींचा परीसर आहे. वस्त्यां प्रमाणेच येथील लोकसंख्याही दाटीवाटी आहे. तसेच,चाळीतही प्रत्येक मजल्यावर सार्वजनिक शौचालय असल्याने कोविडचा संसर्ग (corona infection) होण्याचा धोका अधिक आहे. मात्र, तरीही या भागातील रुग्णवाढीचा दर मुंबईतील सर्वात कमी दर आहे. ( Less corona new patients in mumbai area like lalbaug parel byculla marine line-nss91)

संपुर्ण मुंबईचा सरासरी रुग्णवाढीचा दर 0.05 टक्के आहेत.तर, एफ दक्षिण लालबाग परळ,बी सॅन्डहर्स्ट रोड आणि सी मरीनलाईन्स आणि चर्निरोड परीसरात रुग्णवाढीचा दर 0.03 टक्के आहेत.तर,सी प्रभागात रुग्णदुप्पट होण्याचा कालावधी 2 हजार 761 दिवस असून हा मुंबईतील सर्वात जास्त कालावधी आहे.त्या खालोखाल लालबाग परळ 2 हजार 473 दिवस आणि सॅन्डहर्स्ट रोड परीसरात 2 हजार 379 दिवसात कोविडचे रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी आहे.

सी प्रभागात आता पर्यंत 6 हजार 891 रुग्णांची नोंद झाली असून त्यातील 27 जणांवर अद्याप उपचार सुरु असून आता पर्यंत 268 जणांचामृत्यू झाला आहे.बी प्रभागात 3 हजार 897 रुग्णांची नोंद झाली असून 182 जणांचा मृत्यू झाला अाहे तर 14 जणांवर अद्याप उपचार सुरु आहे. एफ दक्षिण प्रभागात 20 हजार630 रुग्णांची नोंद झाली असून त्यातील 626 जणांचा मृत्यू झाला आहे.तर,87 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत.

दिवस --- बी ---- एफ दक्षिण ---सी

22 जुलै 2 12 2

23 जुलै 0 8 1

24 जुलै 2 4 2

25 जुलै 0 2 1

26 जुलै 0 5 3

27 जुलै 1 3 3

28 जुलै 3 6 1

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut Allegation : आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेमुळे एकनाथ शिंदे निवडणूक जिंकले, संजय राऊत यांचा गंभीर आरोप

Pune MLC Election 2026 : महाविकास आघाडीचे ठरले! पदवीधरची जागा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला, तर शिक्षक मतदारसंघ पुन्हा काँग्रेसकडेच..; कोणाला मिळणार संधी?

Hatkanangale Railway Accident : हेडफोन घालून मोबाईलवर बोलत निघालेल्या 17 वर्षीय युवतीचा रेल्वेखाली करुण अंत; डॉ. आंबेडकर वसतिगृहासमोरील रेल्वे रुळावर धक्कादायक घटना

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करा

१ हजार ते ६,००० रुपयांत गरबा पार्टनर, व्हायरल पोस्टरनंतर भाजप आमदार आक्रमक; कठोर कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT