मुंबई

'रंजल्या गांजलेल्यांच्या उन्नतीसाठी आम्ही काम करू'; जयंत पाटील यांचे बाबासाहेबांना पत्र

तुषार सोनवणे

मुंबई - महाविकास आघाडीतील महत्वाचे नेते आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन केले आहे. महाविकास आघाडी सरकार रंजल्या गांजल्यांसाठी काम करणार आणि कितीही हल्ले झाले तरी, स्वातंत्र, समता, बंधुता, न्याय या विचारांवर कायम राहणार असल्याचे पत्र त्यांनी बाबासाहेबांना लिहले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापरिनिर्वाण दिनाला आज अनुयायांना चैत्यभूमीवर अभिवादनासाठी उपस्थित राहता आलेले नाही. अनुयायांसाठी राज्य सरकारने ऑनलाईन अभिवादनाची सोय केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंग कोशारी तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बाबासाहेबांना अभिवादन केले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना पत्र लिहले आहे. यावर्षी चैत्यभूमीवर उपस्थित राहता येणार नसल्याने असंख्य अनुयायांनी #LettertoAmbedkar ही मोहिम राबवत चैत्यभूमीच्या पत्त्यावर बाबासाहेबांना पत्र लिहले आहे. जयंत पाटील यांनीसुद्धा या मोहिमेत सहभागी होत, पत्र लिहले आहे.

जयंत पाटील यांनी काय लिहलेय या पत्रात... 

"प्रिय बाबासाहेब,

देशभरातील कोविडचे संकट कमी झाले नसल्याने यंदा आम्ही घरूनच आपल्याला अभिवादन करत आहोत. तुम्ही घालून दिलेल्या विचारांचं आजही आम्ही पालन करत आहोत म्हणून देशहितासाठी आपल्या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर गर्दी न करण्याच्या सरकारच्या आवाहनला चांगला प्रतिसाद मिळतोय

आमचे सरकार संत गाडगेबाबांच्या विचारांना प्रेरित होऊन आम्ही इथल्या रंजल्या गांजलेल्यांच्या उन्नतीसाठी आम्ही काम करू हे आमचे ध्येय आहे. उपेक्षित, वंचितांच्या प्रगतीसाठी आम्ही सदैव कार्यरत राहू.  महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा एक प्रबळ वारसा आहे. या विचारांना तडा न जाऊ देता समता, न्याय, बंधुता या मुल्यांचं आम्ही रक्षण करू! चैत्यभूमी ही आम्हा सर्वांचीच उर्जास्त्रोत आहे, इथली माती आम्हाला नेहमीच उर्जा देत राहील याचा मला विश्वास आहे. महापरिनिर्वाण दिनी तुम्हाला विनम्र अभिवादन!!"

Letter written by Jayant Patil to Babasaheb Ambedkar

-------------------------------------------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WOMEN'S ASIA CUP 2026 FINAL: पाकिस्तानचा पत्ता कट अन् भारतासमोर श्रीलंकेचं आव्हान! महिला एशिया कप फायनल कधी, कुठे आणि किती वाजता?

CM Devendra Fadnavis : विदर्भ बनणार ‘मायनिंग-ग्रीन स्टील हब’; खाण क्षेत्र अर्थव्यवस्थेत अर्धा ट्रिलियन डॉलरचे योगदान

मुंबई गोवा मार्गावर अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी, वाहनांच्या ८ ते ९ किमी रांगा; प्रवाशी संतप्त

Marathi News Live Updates : पुण्याजवळ पाबे घाटात ट्रक दरीत कोसळला, दोघे जखमी

Aditi Swami Success Story : अर्जुन पुरस्कार विजेत्या आदितीचा डंका! मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारीपदी वर्णी; ओजस देवतळे, प्रथमेश फुगे यांचीही नियुक्ती

SCROLL FOR NEXT