rent 
मुंबई

माणुसकीचं दर्शन ! घरमालकानं भाडेकरुंना दिली ही मुभा, म्हणाले...

सकाळवृत्तसेवा

ठाणे : कोरोनाच्या संकटकाळात भाडेतत्वाचा करार संपल्यानंतर भाडेकरुला दोन महिने मोफत रहाण्याची मुभा ठाण्यातील संतोष भागणे यांनी दिली.  त्यामुळे भागणे यांचे भाडेकरु विकास गायकवाड यांनी कौतूक केले असून, आम्हाला त्यांचा आदर वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. 

ठाणे वन विभागात कार्यरत असलेले संतोष भागणे यांचे अंबरनाथ येथे भोईर नगर बारकूपाडा येथे घर आहे. त्यांच्या घरात विकास गायकवाड हे कुटूंबासह गेली चार ते पाच वर्षे भाडेकरु म्हणून वास्तव्य करीत आहेत. 11 महिन्यांच्या करारतत्वानुसार गायकडवाड हे संतोष यांच्या घरात रहातात. यावर्षी कोरोनाचा प्रार्द्रुभाव रोखण्यासाठी मार्च महिन्यापासून लॉकडाऊन घेण्यात आला आहे. या संकटकाळात गायकवाड यांना कराराची मुदत संपल्यानंतर पुढील दोन महिने मोफत रहाण्याची मुभा संतोष भागणे यांनी दिली आहे. 

याविषयी संतोष भागणे म्हणाले,  गायकवाड हे माझ्या घरात गेली चार पाच वर्षे रहात आहेत.  त्यांची आर्थिक परिस्थिती तशी उत्तम आहे. परंतू त्यांची आर्थिक परिस्थिती कशी आहे याचा विचार करण्यापेक्षा मी माणूसकीच्या दृष्टीने विचार केला. गायकवाड यांचे करारपत्र ऑक्टोबर महिन्यात संपत आहे. 11 महिन्याचा करार असल्याने त्यांनी आधीच सर्व महिन्याचे भाडे भरलेले आहे. त्यामुळे त्यांना मार्च व मे महिन्याचे भाडे कमी करण्यापेक्षा करार संपल्यानंतर नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात करार न करता रहाण्याची मी मुभा दिली आहे. 

शासनाच्या नियमाचे पालन 
घरमालकांनी घरभाड्यासाठी तगादा लावू नये असे राज्य सरकारने आदेश दिले असले तरी अनेक भाडेकरुंच्या घरात चिंतेचे वातावरण दिसते. कारण अद्याप त्यांना घरमालकाचा तसा कोणताही संदेश आलेला नाही. संतोष यांनी मात्र राज्य शासनाचा निर्णय जाहीर होताच भाडेकरुंना मुभा देत भाडेकरुंच्या मनात घरमालकाविषयी आदराची भावना निर्माण केली आहे.

The licenar gave  Discount tenants the lease saying

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karnataka HIV student: कर्नाटकमध्ये खरंच सात हजार विद्यार्थ्यांना HIV लागण? 'एड्स प्रिव्हेंशन सोसायटी'कडून अधिकृत निवेदन जारी

Ambedkar Cultural Hall: आंबेडकर सांस्कृतिक भवन विस्ताराला स्थायी समितीची मंजुरी; २५ कोटींच्या निधीसाठी राज्य सरकारकडे मागणी

Pune Hotmix Plant : डांबरटंचाईवर उपाय: पुणे महापालिकेकडून हॉटमिक्स प्लांटसाठी १४ कोटींची मंजुरी, खड्डे दुरुस्तीला वेग

MahaRERA Ruling: महारेरा : विकसकाला घरखरेदीदाराची परवानगीशिवाय फ्लॅट बुकिंग रद्द करण्यास मज्जाव; उशिरा ताबा दिल्यास व्याज देण्याचा आदेश

Pune domestic violence FIR: मानपान व मोटार न दिल्याच्या कारणावरून विवाहितेचा छळ; पतीसह चौघांविरुद्ध नऱ्हे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT