Sanjay-Raut-Attitude E-Sakal
मुंबई

पंतप्रधान मोदींचं विमान महाराष्ट्रात सुद्धा वळेल - संजय राऊत

म्हणून महाराष्ट्राला दुःखी होण्याचं काही कारण नाही

दीनानाथ परब

मुंबई: "गुजरात सुद्धा भारताचा भाग आहे. तिथे देखील नुकसान झालं आहे. गुजरातला जर १ हजार कोटी रुपये दिले असतील, तर कोणत्याही राज्याला आणि महाराष्ट्राला दुःखी होण्याचं काही कारण नाही" असे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत म्हणाले. लवकरच गोव्याला ५०० कोटी तर महाराष्ट्राला दीड हजार कोटी रुपयांची मदत मिळेल, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.

"पंतप्रधान नरेंद्र मोदींचं संपूर्ण देशावर लक्ष आहे. ते दिलदार नेते आहेत. त्यांचं विमान महाराष्ट्रात सुद्धा वळेल" असे राऊत म्हणाले. नरेंद्र मोदी यांनी काल तौक्ते चक्रीवादळामुळे गुजरातमध्ये झालेल्या नुकसानीची हवाई पाहणी केली.

"गोव्याचं जास्त नुकसान झालं आहे. महाराष्ट्राचं किती नुकसान झालय त्याची पंतप्रधानांना कल्पना आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नुकसानी झालेल्या भागांची पाहणी केली. ते सुद्धा आपला अहवाल केंद्राला पाठवतील. ते देखील सांगतील की, महाराष्ट्राला कमीत कमी दीड हजार कोटी मिळाले पाहिजेत. मला विश्वास आहे की महाराष्ट्र आणि गोव्याचं मोठं नुकसान झालं आहे, यामुळे केंद्राकडून दोन्ही राज्यांना मदत होईल" असे राऊत म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पहिली भेट पोलीस भरतीत, नंतर एकाच ठिकाणी पोस्टिंग अन् वाढली जवळीक; आता पुण्यातील दोन महिला पोलीस करणार लग्न

Pune Katraj Ghat: कात्रज घाटात भाजपचे प्रचार साहित्य कचऱ्यात; झेंडे, टोप्या आणि मोदींच्या फोटोचे टीशर्ट आढळल्याने खळबळ

Wheat Flour Export: भारतीय गव्हाचे पीठ आता परदेशात जाणार! ४ वर्षांची निर्यातबंदी अखेर हटवली; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय

Marathi News Live Updates : भविष्यात अशी कोणतीही घटना घडणार नाही, याची आपण सर्वांनी खबरदारी घेतली पाहिजे - शायना एनसी

Phulambri News: आमदार होताच पहिल्याच निवेदनात मोठी मागणी; फुलंब्रीत छत्रपती संभाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारणार?

SCROLL FOR NEXT