मुंबई

संतापजनक! चौदा वर्षाच्या मुलीवर अतिप्रसंग करून हत्या; रोहा पोलिसांनी 12 तासांत आरोपीला ठोकल्या बेड्या

महेंद्र दुसार - सकाळ वृत्तसेवा


अलिबाग : रोहा तालुक्यातील तांबडी येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या करणार्‍या नराधमाला रोहा पोलिसांनी बारा तासांच्या तासात बेड्या ठोकल्या आहेत.  

हत्येची बातमी सोमवारी (27 जुलै) रोह्यात पसरताच रोहेकरांमध्ये प्रंचड संताप झाला होता. घटनेनंतर पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, अपर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, रोह्याचे डिवायएसपी किरण सूर्यवंशी आणि रोहा पोलीस निरीक्षक बंडगर यांनी तपास सुरु केला होता. अखेर 12 तासाच्या आतच आरोपीला पकडण्यात यश आले आहे. पीडित मुलगी तिच्या आजोबांना शेतावरुन आणण्यासाठी निघाली होती. रोहा तांबडी येथील  पिडीत मुलीचे आजोबा हे रविवारी (26 जुलै) त्यांच्या ताम्हणशेत येथील शेतावर काम करत होते. सायंकाळी पावणेसहा वाजण्याच्या दरम्यान 14 वर्षांची नात दुचाकी घेऊन त्यांना आणण्यासाठी निघाली. मात्र रात्रीचे आठ वाजले तरी न परतल्याने तिच्या आई वडिलांनी शोधाशोध सुरु केली. मात्र सर्वत्र अंधार पसरल्यामुळे ती सापडली नाही.

शेवटी ग्रामस्थांनी शोध घेण्यास सुरुवात केली, असता रात्री साडेनऊ वाजण्याच्यादरम्यान ताम्हणशेत बुद्रुक गावच्या रस्त्यावरील वावळ्यांचा कोंड या ओहळाच्या मध्यभागी एका दगडावर ती मृतावस्थेत आढळून आली. तिच्यावर अतिप्रसंग करुन तिची हत्या करण्यात आली आहे, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

-----------------------------------------------

संपादन - तुषार सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

Pune Crime : उरुळी कांचनमध्ये पतीकडून पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड हल्ला; १५ दिवस घरात कैद

SCROLL FOR NEXT