Lata Mangeshkar Sakal
मुंबई

Updates : लता मंगेशकर यांची प्रकृती स्थिर; आशा भोसले यांची माहिती

मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात लता मंगेशकर यांच्यावर उपचार सुरु आहेत.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : भारताची गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांची प्रकृती चिंताजनक असून मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital) त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी विविध नेत्यांनी रुग्णालयाकडे धाव घेतली आहे. दरम्यान, पाच वाजण्याच्या सुमारास मेडिकल बुलिटनमध्ये त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं की, त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं असलं तरी ते उपचारांना प्रतिसाद देत आहेत. (Lata Mangeshkar health is critical Leaders rushed to the hospital)

  • देवेंद्र फडणवीस : "ईश्वराचा एक चमत्कार म्हणजे लता दीदी. ज्या प्रकारे गाण कोकिळा म्हणून लतादीदी प्रसिद्ध झाल्या आहेत. अनेक वर्षे त्या आम्हाला हव्या आहेत. ईश्वरानं त्यांना दुर्षायुष्य द्यावं. मला खात्री आहे कोट्यावधी जनतेच्या शुभेच्छा त्यांच्या मागे आहेत. त्यामुळे त्या या संकटातून बाहेर येतील"

  • केंद्रीय मंत्री पीयूष गोयल हे देखील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाले आहेत. "लता दीदी लवकर बऱ्या झाल्या पाहिजेत, आम्ही सगळे प्रार्थना करत आहोत. त्या उपचारांना चांगला प्रतिसाद देता आहेत. PM नरेंद्र मोदी हे देखील त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहेत. लवकरच आपण त्यांना इथून घरी घेऊन जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो.

  • दरम्यान, लता मंगेशकर यांचे बंधू आणि ज्येष्ठ संगितकार हृदयनाथ मंगेशकर यांनी देखील रुग्णालयात जाऊन दीदींची चौकशी केली. यावेळी त्यांनी "दीदी ठीक आहेत" अशी प्रतिक्रिया दिली.

  • राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील काही वेळापूर्वी लता दीदींच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात पोहोचल्या होत्या.

  • आशा भोसले थोड्याच वेळापूर्वी लता मंगेशकर यांची रुग्णालयात जाऊन तब्बेतीची चौकशी करण्यासाठी रुग्णालयात आल्या होत्या. रुग्णालयातून बाहेर पडताना त्यांनी 'दिदींच्या तब्बेतीमध्ये बऱ्यापैकी इंप्रुव्हमेंट आहे' अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

  • मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दुपारपासून रुग्णालयात आहेत. याठिकाणी त्यांनी लता दीदींच्या प्रकृतीची विचारपूस केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दुर्घटनेतून एकटा वाचला, आता घरी एकटाच बसून राहतो, पत्नी-मुलाशीही बोलत नाही; कशी झालीय अवस्था?

Free Electricity: राज्यात सर्वसामान्यांना २५ वर्षे मोफत वीज; १०० युनिटपर्यंत दिलासा, स्मार्ट योजनेसाठी महावितरणचा पुढाकार

Sourav Ganguly Video : महिलांना क्रिकेट खेळण्याची गरज नाही! सौरव गांगुलीचा जुना व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय म्हणाला होता? ऐका...

Latest Marathi News Live Update : फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरण,नागपुरात डॉक्टरांची शांतता रॅली

Nagpur News: बहिणीच्या मूळ पेशींमुळे चिमुकलीला मिळाले जीवनदान; रक्ताच्या कर्करोगावर बोनमॅरो ट्रान्सप्लांट ठरले यशस्वी

SCROLL FOR NEXT