बदलापूर : लोकलमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रवाशांनी लावलेली रांग. 
मुंबई

लोकल प्रवाशांचा रांगेद्वारे "घिसडघाई'ला राम राम 

गिरीश त्रिवेदी

बदलापूर : गर्दीच्या वेळी लोकलमध्ये चढताना होणारी कसरत, ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग, लहान मुलांचे होणारे हाल टाळण्यासाठी उपनगरीय रेल्वेस्थानकांत हल्ली रांगा लावून लोकलमध्ये प्रवेश केला जातो. मध्य रेल्वेच्या डोंबिवली, शहाड, कल्याणपाठोपाठ आता बदलापुरातही प्रथम श्रेणीतील प्रवाशांनी रांगा लावून लोकलमध्ये प्रवेश करायला सुरुवात केली आहे. प्रवाशांच्या या पुढाकाराचे सर्वच स्तरातून स्वागत होत आहे. 

बदलापूरची लोकसंख्या आणि त्याबरोबरच रेल्वे उपनगरीय प्रवाशांची संख्या प्रचंड वाढत आहे. त्या तुलनेत रेल्वे प्रशासन ना लोकल वाढवते, ना डबे वाढवते. त्यामुळे गर्दीतूनही सुखकर प्रवास व्हावा, यासाठी उपनगरीय प्रवाशांनी स्वतःच स्वयंशिस्त लावून घेतली आहे. बदलापूर रेल्वेस्थानकात प्रथम श्रेणीचे प्रवासी लोकल स्थानकात येण्यापूर्वी रांग लावून उभे रहातात. लोकल आली, की रांगेत प्रवेश करतात. त्यातही ज्येष्ठ नागरिक आले, तर त्यांना प्राधान्य देऊन सहकार्य करतात. गेल्या सहा महिन्यांपासून हा प्रयोग सुरू असून याला प्रवाशांचा प्रतिसादही मिळत आहे. 

बदलापूर स्थानकातून सुटणाऱ्या लोकलमध्ये रांगेत उभ्या असलेल्या सर्व प्रवाशांना प्रवेश मिळू शकतो. मात्र कर्जत, खोपोली येथून मुंबईकडे जाणाऱ्या लोकलमध्ये रांगेतील पहिल्या आठ ते दहा प्रवाशांनाच जेमतेम प्रवेश मिळतो. रांगेतील अन्य प्रवासी लोकलमध्ये चढूही शकत नाहीत. तरीही प्रवासी रांगा लावून प्रवेश करतात. पुरुष प्रवाशांची ही शिस्त पाहून महिला प्रवासीही रांग लावून लोकलमध्ये प्रवेश करू लागल्या आहेत. सकाळी साडेसातपासून रांग लागायला सुरुवात होते. गेल्या सहा महिन्यांपासून या रांगेचा मी लाभ घेत असल्याचे प्रवासी आर. यादव यांनी सांगितले. 

धक्काबुक्की, अपघात टाळण्यासाठी... 
मेट्रोमध्ये ज्याप्रमाणे रांगेत डब्यात प्रवेश दिला जातो, त्याचप्रमाणे आपणही स्वतःहून रांग लावून डब्यात प्रवेश केल्यास सर्वांना सोयीचे होईल. लोकलमध्ये चढताना धक्काबुक्की, पडून जखमी होण्याचे प्रकार वाढले आहेत. याला आळा बसावा, अपघात घडू नयेत, सर्वांना व्यवस्थित लोकलमध्ये शिरता येईल या हेतूने रांग लावायची पद्धत सुरू केली आहे, त्याला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे अंकुश इंगवले आणि सीताराम सुर्वे यांनी सांगितले. 

रेल्वे ही राष्ट्रीय संपत्ती असल्याने तिचे नुकसान न होता जास्तीत जास्त शांततेत काय सुधारणा करता येतील, याचा अभ्यास प्रवासी करीत असतात. यातूनच प्रथम श्रेणीच्या प्रवाशांनी रांग लावून लोकलमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांचा त्रास कमी व्हावा, त्यातूनही ज्येष्ठ नागरिक, विशेष प्रवासी यांना सहकार्य करण्याची भूमिका या प्रवाशांची आहे. 
- रमेश महाजन, अध्यक्ष 
रेल्वे प्रवासी सहकारी मित्र संस्था 

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune-Kolad Road Accident : पुणे-कोलाड मार्गावर लवळे फाट्याजवळ भीषण अपघात; सिमेंटच्या ट्रकने कार-दुचाकींना उडवले, एकजण जागीच ठार, दोघे गंभीर

प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवा ट्विस्ट! गोळी आरोपीलाही लागल्याची शक्यता, एसआयटीकडून पुरावे संकलित

मुंबईत आंदोलन करणं CJPला महागात पडलं! अभिजीत दिपकेंसह सर्व आंदोलकांवर गुन्हा दाखल, पोलिसांची कडक कारवाई

Latest Marathi News Live Update : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी जंतर-मंतरवर १० ऑक्टोबरला CJPचे आंदोलन

Sarva Pitri Amavasya 2026: यंदा सर्वपित्री अमावस्या कधी आहे? जाणून घ्या शुभ तिथी, तर्पण मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व

SCROLL FOR NEXT