Mumbai Local sakal
मुंबई

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

मुंबई लोकलमधील गर्दीमुळे तिघा प्रवाशांचा बळी गेल्यामुळे वाढत्या प्रवासीसंख्येचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - मुंबई लोकलमधील गर्दीमुळे तिघा प्रवाशांचा बळी गेल्यामुळे वाढत्या प्रवासीसंख्येचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेची दखल घेत महामुंबईतील सरकारी आणि खासगी कार्यलयाच्या कार्यालयीन वेळेत बदल करण्याचे विनंती पत्र पाठविण्यात येणार आहे.

उपनगरीय लोकल ट्रेनच्या पिक आवर्सममध्ये प्रवाशांच्या अतिरिक्त गर्दीमुळे अपघात घडत आहे. हे अपघात कमी करण्यासाठी आणि लोकलवरील गर्दीचा ताण कमी करण्यासाठी सरकारी आणि खासगी कार्यलयाचे कार्यालयीन वेळेत बदल करण्याचे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.

यांसदर्भात ८०० हून अधिक कार्यालयांना वेळा बदलण्याची विनंती पत्र पाठविले होते. आतापर्यंत या विनंती पत्राला केवळ ३३ कार्यालयांनी कार्यालयीन वेळा बदलण्यासाठी संमती दिली आहे. जोपर्यंत अजून अधिक कार्यालय या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार नाहीत तोपर्यंत याचा फायदा सर्व लोकांपर्यंत पोहोचणार नाही.

मध्य रेल्वे अजून एकदा सर्व कार्यालयांना ही विनंती करते की आपण सर्वांनी स्वयंस्फूर्तीने कार्यालयाची वेळ बदलण्याचा प्रयत्न करावा ज्या मुळे आपल्या कर्मचाऱ्यांना प्रवास करणे सोयीस्कर होईल आणि धोकादायक पद्धतीने प्रवास करणाऱ्यांची संख्या देखील कमी होईल अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्निल डी नीला यांनी दिली आहे.

या ३३ कार्यालयांनी दर्शवली सहमती

महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, मुंबई विद्यापीठ, एसबीआय, पोस्ट मास्टर जनरल, महासंचालक शिपिंग मुंबई,वस्त्रोद्योग आयुक्त, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, बीएआरसी, ऑल इंडिया असोसिएशन ऑफ इंडस्ट्रीज, बजाज इलेक्ट्रिकल्स गोदरेज आणि बॉयस, एमआरव्हीसी, जमनालाल बजाज संस्था, पारसी जिमखाना, हिंदुस्तान पेन्सिल प्रायव्हेट लिमिटेड, नोव्होटेल, ब्लू स्टार अशा एकूण ३३ आस्थापनांनी कार्यालयीन वेळ बदलण्यास सहमती दर्शवली आहे.

रेल्वे बोर्डाकडून प्रयत्न -

विशेष म्हणजे रेल्वे बोर्डाला सुद्धा राज्य सरकारला कार्यालयीन वेळेत बदल करण्याचे पत्र पाठविण्याची विनंती मध्य रेल्वेकडून करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नोरासारखी दिसायला पाहिजे, पत्नीला दररोज ३ तास...; पतीकडून छळ, महिलेची पोलिसात तक्रार

Maharashtra Latest News Update: महत्वाच्या विषयांवर फडणवीसांची भेट घेतली- राज ठाकरे

Reels addiction Impact on Brain Like Alcohol: रील्सचा मोह करतोय मेंदूवर दारूसारखा परिणाम? जाणून घ्या धोके आणि तज्ज्ञांनी सांगितलेले उपाय

माेठी बातमी! 'इंडिया आघाडीचे खासदार आक्रमक; दूध दर वाढीसाठी संसद भवनासमोर आंदोलन', भेसळ करणाऱ्यांवर कारवाई करा

Pune Rain Update : ताम्हिणी घाटात ५७५ मिमी पावसाची नोंद; पुण्यात रेड अलर्ट

SCROLL FOR NEXT