technical failure mumbai local train  sakal
मुंबई

Mumbai Local News : मध्य रेल्वेची वाहतूक सेवा ठप्प! पुढील अर्ध्या तासात वाहतूक सुरळीत होण्याची शक्यता

अंबरनाथ-बदलापूर दरम्यान मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक सेवा ठप्प

अंकिता खाणे (Ankita Khane)

मध्य रेल्वेची वाहतूक सेवा ठप्प झाली आहे. अंबरनाथ आणि बदलापूर दरम्यान मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे सीएसटी, कर्जत, बदलापूरकडे जाणारी लोकलसेवा ठप्प झाली आहे. आज रविवार सुट्टीचा दिवस गणेशोत्सव जवळ आल्याने अनेकजण खरेदीसाठी बाहेर पडत आहेत. त्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

अंबरनाथ आणि बदलापूर दरम्यान मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक सेवा ठप्प झाली आहे. यामुळे कर्जतकडून मुंबईच्या दिशेने येणारी लोकल वाहतूक विस्कळीत झाली आहे. कल्याण लोको शेड मधून इंजिन मागविण्यात आले आहे. पुढील अर्ध्या तासात वाहतूक सुरळीत होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

कल्याण लोको शेड मधून इंजिन मागविण्यात आले आहे. गेल्या अर्ध्या तासापासून वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे. दुरुस्तीसाठी आणखी आर्धा तास लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली होती.

गणेशोत्सव एक-दोन दिवसांवर आला आहे. त्याआधी रविवार असल्याने नागरिकांची खरेदीसाठी मोठी गर्दी होते. नागरिकांना अडथळा होऊ नये म्हणून रेल्वेने आजचा मेगाब्लॉकही रद्द केला. मात्र तरीही प्रवाशांची गैरसोय झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : अमित ठाकरे सपत्नीक वरळी डोममध्ये पोहचले; राज अन् उद्धव ठाकरेही रवाना

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव सहभागी; "झेंडा नाही अजेंडा बघून लोक एकत्र"

Anil Parab : मनसे-ठाकरे गटाची युती होणार? अनिल परब यांचं सूचक वक्तव्य; म्हणाले, 'आजचा हा मेळावा म्हणजे...'

SCROLL FOR NEXT