Corona sakal media
मुंबई

कोविडच्या निर्बंध शिथिलतेनंतर मुंबईकरांची पुढचे २८ दिवस परीक्षा

वागणुकीच्या स्वभावावर ठरणार तिसऱ्या लाटेची दिशा

भाग्यश्री भुवड

मुंबई : मुंबईतील टाळेबंदी (lockdown) टप्प्याटप्प्याने शिथिल करण्यात येत असली तरी देखील डेल्टा व्हेरियंट, (delta variant) त्यातील आर फॅक्टर आणि यातून संभाव्य तिसरी लाटे (corona third wave) बाबत सावध राहण्याची गरज आहे. 1 ऑगस्ट पासून निर्बंध शिथिलता वाढवण्यात आल्याने त्या दिवसापासून आगामी 28 दिवस मुंबईकरांसाठी परीक्षेचे ठरणार आहेत. विषाणूचा इन्क्युबेशन पिरियड नियमानुसार नाही सांभाळल्यास घातकी ठरू शकते असे वैद्यकीय तज्ज्ञ सुचवीत आहेत. ( lockdown-delta variant-corona third wave-coronavirus-nss91)

दरम्यान, यावर बोलताना केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितले की, टाळेबंदी नंतर 28 दिवसांचा कालावधी परीक्षेचा असतो. या कालावधीत गंभीर रुग्णांचे मृत्यू आणि गंभीर रूग्ण दाखल होण्याचे प्रमाण वाढले तर ती लाटेची लक्षण मानली जातात. तरी देखील पालिका सज्ज असल्याचे ही डॉ. देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. त्यासाठी तीन जम्बो कोविड केंद्र तयार करण्यात आली आहेत. सायन, कांजूरमार्ग आणि दहिसर या ठिकाणी 6 हजार बेड्स संपूर्ण सुविधेसह सज्ज आहेत. मात्र, हे लोकांच्या कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर म्हणजेच वागणुकीच्या स्वभावावर अवलंबून राहणार आहे.

डेल्टा प्लसचा आर फॅक्टर :

कोरोना व्हायरसने नवे रुप धारण केले असून सध्याचा डेल्टा प्लस व्हेरिएंट घातक असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञ मांडतात. तर, त्यातीलही व्हायरसचा आर फॅक्टर हा हजार पटीने संसर्ग पसरवत असतो. हा फॅक्टर डेल्टा व्हेरियंट मध्ये असून डेल्टा व्हेरियंट तिसऱ्या लाटेला प्रमुख कारणीभूत असल्याचे जागतिक पातळीवर दिसून येत आहे. सध्या मुंबईत 3 डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे, हे रुग्ण वाढू नये म्हणून मुंबईकरांनी मास्कचा वापर करणे आवश्यक आहे. शिवाय, अनावश्यक गर्दी टाळावी असे आवाहन टास्क फोर्स सदस्य डाॅ. अविनाश सुपे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ढगफुटीसारखा पाऊस, घरांमध्ये पाणी; नागपूरच्या परिस्थितीवर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया

एसटी स्मार्ट कार्डसाठी मोठा दिलासा! अर्जाची मुदत वाढवली; पण किती? जाणून घ्या नवी मुदत

WhatsApp Web वर आले 5 भन्नाट फीचर्स! ग्रुप व्हिडिओ कॉल ते QuickHD पर्यंत जाणून घ्या सर्व काही

Live Marathi News Update : राधानगरी धरणाच्या स्वयंचलीत दरवाजांच्या पातळीपर्यंत पाणी

Teachers Rules: शिक्षकांची निवडणूक ड्युटी कधी लावता येते, कधी नाही? निवडणूक आयोगाने सांगितले नवे नियम; जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT