मुंबई

लॉकडाऊनचा फटका, फोर्टमधील कॅमेरा मार्केट मंदीच्या विळख्यात

दिनेश चिलप मराठे

मुंबईः  काही हजारांपासून ते 15 लाखांपर्यत मिळणाऱ्या फोटोग्राफी आणि व्हिडिओ शूटिंगच्या कॅमेराचे मुंबईतील सर्वात जुने आणि मुख्य मार्केट म्हणजे फोर्टची कॅमेरा गल्ली होय. कोरोनाच्या महामारीत चार महिने लॉकडाऊन असल्यानं कॅमेरा मार्केट बंद होते. आता मार्केट रिओपन होऊन एक महिना झाला आहे. मात्र येथे पूर्वी सारखी गिऱ्हाईकांची ये-जा नसल्याने कोटयावधी रूपयांची वार्षिक उलाढाल असणाऱ्या या कॅमेरा मार्केटला मंदीच्या विळख्यात गेल्याचे दिसून येत आहे.

येथे जवळपास 300 दुकाने कॅमेरा विक्री, दुरुस्ती आणि माल गोडाऊन अशी आहेत. त्यातील काही दुकाने व्यवसाय मंदीत असल्याने कायमची बंद होताना दिसत आहेत. कॅमेरा गल्लीच्या आसपास तळ मजला तसेच पहिला मजला अशी विविध इमारतीत दुकाने आहेत.

सर्वसामान्यपणे तीस हजारांपासून ते दीड लाख दोन लाख आणि तीन लाख ते पाच लाख लाखांच्या रेंजमध्ये कॅमेरे विक्रीसाठी उपलब्ध असून 15 लाखांचे एचडी व्हिडिओ कॅमेरे  मिळतात. त्याचबरोबर येथे सेकंडहैंड फोटो, व्हिडिओ कॅमेराही विकत मिळतात.

फोर्ट येथील कॅमेरा गल्ली एम.के.मार्ग, फोर्ट बोरा बाजार येथे विविध कॅमेराची दुकाने असून या दुकानांमध्ये निकॉन, सोनी, कॅनन, फुजिफिल्म, पॅनासोनीक, फिलिप्स, कोडेक अशा विविध प्रकारच्या फोटो आणि व्हिडिओ कॅमेरा उपलब्ध आहेत. जुन्या कॅमेऱ्याची खरेदी विक्री आणि दुरुस्ती ही येथे केली जाते. सेल्फी स्टिक, गोप्रो केमेरा, कॅमेरा बॅग, स्टूडिओ एक्सेसरीज येथील विविध दुकानांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

पूर्वीचा जमाना जाऊन आता डिजिटल कॅमेरे आलेले आहेत. तसे डिजिटल सिंगल रिफ्लेक्टर्स कॅमेरा मिळतात. पूर्वीसारखे व्हिडिओ कॅमेऱ्यामध्ये कॅसेटचा उपयोग होत नाही. आता कॅमेरा डिजिटल स्वरूपात आलेले असून त्यात मेमरी कार्डचा उपयोग केला जातो. 

ताराबाई यादव यांचा बोरा बाजार येथे स्टुडिओ असून लाईट फोटोग्रफी बॅटरी चार्जर कोटा लाईट एलईडी लाईट फ्रॉम पिक्चर मॉडेलिंग फोटोग्राफी साठी वापरल्या जाणाऱ्या लाईटचा मेंटेनेस व्यवसाय असून या व्यवसायात त्यांनी चाळीस वर्षे घालवली आहेत. त्यांनी लॉकडाऊन पूर्वी दोन लाखांचा माल भरलं आणि आता चार महिने दुकान बंद असल्यामुळे तो माल तसाच पडून राहिला. ताराबाई यादव यांच्याप्रमाणेच जवळपास दोनशे कुटुंब या व्यवसायात आहे. आता त्यांचा हा व्यवसाय देशोधडीला लागला आहे. मेंटेनेस येणार काम अवघ्या दहा टक्क्यांवर आल्यामुळे आता नेमकं काय करावं कुटुंबाचा खर्च कसा भागवावा. तसंच भविष्यातील मुलांची शाळा मुलींचं लग्न आणि वार्धक्यातील आपल्या वैद्यकीय औषध पाण्याचा खर्च कसा भागवावा असे काही प्रश्न त्यांच्यासमोर उभे आहेत. 

चिराग वासू यांचं केमट्रोनिक्स ट्रेडिंग कंपनी नावाचं रिटेल शॉप आहे. यांच्याकडे जवळपास पाचशे ते सहाशे नियमित गिऱ्हाईक असून लॉकडाऊन पासून त्यांचा धंदा होता. त्या त्यापेक्षाही कमी झालेला आहे. त्यांच्याकडे स्टुडिओसाठी लागणारे सगळे साहित्य उपलब्ध आहेत. पोटा लाईट पासून ते छत्री लाईट, मेमरी कार्ड, ट्रायपॉड अशी विविधा ॲक्सेसरीज त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. ऑनलाइन शॉपिंगमुळे आधीच व्यवसाय संकटात होता. तो आता कोलमडला आहे. त्यांनी ठरवलं आहे की जे सहाशे ते सातशे कस्टमर आहेत. फक्त त्यांच्याशी संपर्क साधून व्यवसाय करावा. त्यांनी सद्यस्थितीत असलेले एक दुकान ठेवायचे दूसरे दोन्ही बंद करत आहे. कारण एका दुकानाचे चाळीस ते पन्नास हजार मासिक भाडे या मंदीमुळे परवडत नाही. येथेच पहिल्या माळ्यावरती एक गोडाऊन घेऊन त्यातच व्यवसाय करणार आहेत असं त्यांनी सांगितलं.

डी सेव्हन टू डबल झिरो 7200 d3500 फ्लॅश बॅटरी केबल व्हिडिओ एलईडी लाईट माइक फोटोशूट मोठा लाईट एलईडी कॅमेरा लेंस व्हिडिओ शूटिंग कॅमेरा लेंस आदी दुरुस्तीची ही अनेक दुकाने आहेत. ती ही गिऱ्हाईक नसल्याने सुनीसुनी दिसत आहेत.

नईम शेख यांचं न्यूज ऑन एअर न्यू झूम झूम केअर वर्षांपासून संपूर्ण कुटुंबाचा पालन-पोषण यास दुकानावरती त्यांचं होतं. पूर्वी त्यांच्याकडे नियमित दहा ते बारा कॅमेरे दुरुस्तीसाठी येत असायचे. सकाळी सात वाजता ते दुकानात यायचे आणि संध्याकाळी दहा वाजेपर्यंत दुकानात बसायचे आज परिस्थिती अशी आहे. पूर्वी महिन्याला 60 ते 70 हजार रुपये उत्पन्न मिळायचे आत्ताचे उत्पन्न पंधरा ते वीस हजार पर्यंत आलेला आहे. त्यामुळे घर घराचा खर्च दुकानाचं भाडं नोकरांचे पगार काढणं, मुश्कील झालेला आहे. त्यामुळे व्यवसाय काय करायचं खायचं काय जगायचं कसं असा यक्ष प्रश्न त्यांच्यापुढे उभा राहिलेला आहे.

शैलेश करंडे हे कमर्शियल फोटो व्हिडिओ ग्राफर असून ते गेली 30 वर्षे या मार्केटमध्ये फोटो, व्हिडिओ कॅमेरा संदर्भात काम करतात. एक काळ असा होता की येथे फिल्म इंडस्ट्रीमध्ये येथून कॅमेरा जात असे. मार्केटचे सुवर्ण युग होते. आता मात्र हे मार्केट उध्वस्त व्हायच्या मार्गावर आहे. गिऱ्हाईक नाही मग माल पडून आहे. व्यवसायिक जगेल कसा हाच मोठा प्रश्न आहे.

--------------

(संपादनः पूजा विचारे) 

Lockdown hits camera market in Fort

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT