मुंबई

लॉकडाऊनमुळे पक्षाघाताचे प्रमाण वाढले; कोव्हिड काळात आरोग्याकडे दुर्लक्ष झाल्याचा परिणाम

मिलिंद तांबे

मुंबई : कोविड काळात आरोग्याकडे दुर्लक्ष झाल्याने पक्षाघाताचे प्रमाण वाढले आहे. नानावटी रूग्णालयाने केलेल्या अभ्यासात कोविड काळात पक्षाघात झालेल्या रूग्णांमद्ये 1.4 टक्क्यांनी वाढ झाल्याचे समोर आले आहे. पक्षाघाताच्या लक्षणांकडे दुर्लक्ष झाल्याने काही रूग्णांचा मृत्यू झाल्याचे देखील झाले आहेत. त्यामुळे पक्षाघाताच्या लक्षणांकडे दुर्लक्ष न कऱण्याचे आवाहन तज्ञ डॉक्टरांनी केले आहे.

नानावटी रूग्णालयातील तज्ञ डॉक्टरांच्या पथकाने 1 ऑगस्ट ते 31 ऑक्टोबर दरम्यान रूग्णालयात येणा-या 1500 रूग्णांचा अभ्यास केला. त्यातील 21 रूग्णांना पक्षाघात झाल्याचे समोर आले. रूग्णांपैकी 15 जण कोविड तर 6 जण नॉन कोविड रूग्ण असल्याचे समोर आले आहे. कोविड बाधित रूग्णांना पक्षाघाताचा झटका येण्याचे प्रमाण हे 10 टक्के इतके असल्याचे नानावटी रूग्णालयातील न्येरोलॉजी विभागाचे संचालक तसेच प्रमुख डॉ प्रद्युम्न ओक यांनी सांगितले. 

पक्षाघाताची लक्षणे ही पक्षाघात येण्यापुर्वी काही दिवसांपासून जाणवणे सुरू होते.  ही लक्षणे ओळखून पक्षाघाताचे उपचार वेळेत सुरू होणे महत्वाचे असते. मात्र या 21 पक्षाघाताच्या रूग्णांपैकी एकाही रूग्णाने वेळेत उपचार घेतले नसल्याचे ही अभ्यासात समोर आले आहे. त्यामुळे यातील काही रूग्णांची परिस्थिती गंभीर झाल्याने त्यातील 4 रूग्णांना आपला जीव गमवावा लागल्याचे ही डॉ. प्रद्युम्न ओक यांनी सांगितले.

आपल्याकडे कोविड नियंत्रणात असला तरी लोकांमध्ये या आजाराची प्रचंड भिती आहे. त्यामुळे काही दुखलं खूपलं तरी लोकं डॉक्टरकडे किंवा रूग्णालयात जाणे टाळत आहेत. अनेक लोकं घरच्या घरीच औषधं खावून बरे होण्याचा प्रयत्तन करतात. मात्र यामुळे दुखणे वाढण्याची शक्यता अधिक असते. तर काही रूग्ण छोट्या मोठ्या डिस्पेंसरी किंवा नर्सिंग होम मध्ये जाऊन उपचार घेण्याचा प्रयत्न करतात. मात्र तेथे देखील सुविधांचा अभाव असल्याने रूग्णांना योग्य उपचार मिळत नसल्याचे डॉ.प्रद्युम्न ओक यांनी सांगितले.    

कोविडची झळ पोहोचलेल्या देशांपेक्षा आपल्याकडे परिस्थिती काहीशी बरी आहे. तरी देखील आपण आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे आहे. मात्र आरोग्याबाबत आपल्याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असून प्रत्येक 5 पैकी 4 व्यक्ती ह्या आपल्या आजाराबाबत अनभिज्ञ असल्याचे समोर आल्याचे ही डॉ.ओक यांनी सांगितले. रूग्णांच्या अडचणी लक्षात घेऊन नानावटी रूग्णालयाने रूग्णांसाठी हेल्पनाईन सुरू कऱण्याचा निर्णय़ घेतला असून आपल्या आरोग्याबाबत काहीही जाणून घ्यायचे असल्यास गरजूंना या सुविधेचा 24 तास मोफत लाभ घेता येणार असल्याचे ही डॉ.प्रद्युम्न ओक म्हणाले.

पक्षाघाताच्या प्रकरणात गोल्डन आवर फार महत्वाचे असतात. पक्षाघाताचा झटका आल्यास पहिल्या साडे चार तासाच रूग्णाला योग्य उपचार मिळणे गरजेचे असते. रूग्णाने अधिक वेळ न घालवता डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्वाचे आहे.
डॉ. प्रद्युम्न ओक ,
संचालक , विभाग प्रमुख , न्यूरोलॉजी 

----------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Water Supply: सांडपाणी भागवणार मुंबईकरांची तहान, रिसायकल करून पाणी देण्याची BMCची योजना

Kolhapur Ambabai Temple : श्री अंबाबाईच्या ओटीत साडीऐवजी कागदाची रद्दी; भाविकांच्या श्रद्धेशी खेळ; प्रशासनाचे दुर्लक्ष

Ayodhya Ram Mandir: अयोध्येत रामललाच्या दर्शनाची वेळ आणि नियम अचानक बदलले; आता VIP पास सुद्धा बंद, काय आहे कारण?

'मराठी सिनेमासाठी काय करतोय?' विलासराव देशमुखांनी रितेशला विचारलेला प्रश्न, वडिलांची इच्छा सांगताना म्हणाला...'सध्या मराठी भाषेला..'

Chakan News : काळ्या ऑइलवरील शेगड्यांकडे कल; चाकण परिसरामधील छोट्या हॉटेलचालकांना मोठा दिलासा

SCROLL FOR NEXT