मुंबई

#Lockdowneffect : 'आम्हाला मासिक 10 हजार रुपये मदत द्या'; वाचा कोणी केली ही मागणी

प्रशांत कांबळे : सकाळ वृत्तसेवा


मुंबई  लाॅकडाऊनच्या काळाकरीता ऑटोरिक्षा चालक-मालक व त्यांच्या कुटूंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे, त्यामुळे राज्य शासनाने त्यांच्या उदरनिर्वाहासाठी मासिक दहा हजार रुपयांची आर्थीक मदत करण्याची मागणी करण्यात आली आहे. आॅटोरिक्षा टॅक्सी वाहनांच्या वाहतूकदारांच्या अडचणी संदर्भात उपसमितीची सोमवारी (ता.8) रोजी अंधेरी प्रादेशिक परिवहन विभागात बैठक पार पडली. यामध्ये ऑटोरिक्षा टॅक्सीमेन्स युनियन अध्यक्ष शशांक राव यांनी राज्यातील ऑटोरिक्षा चालक-मालक यांचे प्रश्न आणि समस्यांबाबत आपली भुमीका मांडली

कोविड-19 च्या पार्श्वभुमीवर वाहतूकी संदर्भात उपाययोजना करण्यासाठी परिवहन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय वाहतूक कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. त्याची 26 जुन रोजी मुख्य बैठक पार प़डली आहे. तर आॅटोरिक्षा टॅक्सी वाहनांच्या वाहतूकदारांच्या अडचणी संदर्भात उपसमितीची स्थापना करण्यात आली आहे. या उपसमितीची अंधेरी प्रादेशिक परिवहन विभागामध्ये सोमवारी बैठक पार पडली यामध्ये टॅक्सी मेन्स युनियनचे अध्यक्ष शशांक राव यांनी अनेक मागण्या केल्या आहे. 

-------------
या आहेत मागण्या 

  • - लाॅकडाऊनच्या काळाकरीता आॅटोरिक्षा चालक-मालक यांच्या कुटूंबियांच्या उदरनिर्वाहासाठी दहा हजार रूपये मासीक रक्कम देण्यात यावी.
  • - येणाऱ्या महामंदीच्य़ा काळात आॅटोरिक्षाचा व्यवसाय बुडणार असल्याने राज्यातील तमाम चालक मालकांनी घेतलेले कर्ज, त्यावरील व्याज माफ करावे.
  • - चुकीच्या पद्धतीने जप्त केलेल्या रिक्षा तातडीने सोडण्यात याव्यात
  • - लाॅकडाऊन कालावधीत वाहतूक विभागाकडून आकारलेला दंड, ई-चलान तातडीने रद्द करण्यात यावे
  • - तातडीने राज्य रिक्षाचा व्यवसाय काही अटी शर्ती न ठेवता सुरू करण्यास परवानगी देण्यात यावी.
  • - बिकट आर्थीक परिस्थितीमूळे आत्महत्याग्रस्त आॅटोरिक्षा चालकांच्या परिवारांना 10 लाख आर्थीक मदत करावी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT