Dombivli Lodha Heaven Sakal Digital
मुंबई

डोंबिवलीतील लोढा हेवनमधील इमारतींना तडे ; आव्हाड म्हणतात, मराठी माणसाला हे परत...

सकाळ डिजिटल टीम

डोंबिवली-शीळफाटा रस्त्यावर असलेल्या लोढा हेवन परिसरातील एका इमारतीला तडे गेल्याची घटना समोर आलीये. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी याबाबतचे फोटो आणि व्हिडिओ आव्हाड यांनी शेअर केले आहेत.

जितेंद्र आव्हाड यांनी काही इमारतींना तडे गेल्याचे काही छायाचित्र शेअर केले आहेत. एवढ्या नामांकित विकासकाच्या इमारती ५-१० वर्षात खचायला लागल्या तर एकंदरीतच विकासकाने केलेली इमारतीची उभारणी आणि त्याचा दर्जा याबद्दल शंका निर्माण होते, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. 

जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले, शांती उपवन मधील इमारतींमध्ये फ्लॅट विकत घेणारे हे नोकरी करणारे मध्यमवर्गीय कुटुंबातील लोक आहेत. त्यामधील सर्वाधिक रहिवाशी हे मराठी आहेत. येथेसी नागरिकांना इमारती खाली करायला लावली पण त्यांना फर्निचर देखील हलवू दिले नाही. फर्निचरची किंमत देखिल २०-२५ लाख इतकी आहे. 

मराठी माणसाला हे परत उभे करणं परवडणारे नाही. तिथे राहणाऱ्या सर्व समाजबांधवांबद्दल मला प्रचंड वाईट वाटत आहे. मला दूरध्वनीद्वारे अनेक रहिवाशांनी अश्रू ढाळत ही बातमी सांगितली. त्यांचे अश्रू पुसायला हवे म्हणून मी हे ट्वीट करीत आहे. उद्या ह्या इमारतींची परिस्थिती देखिल बघायला जाणार आहे, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. आव्हाड यांनी ट्विट केलेले व्हिडिओ आणि फोटो शांती उपवन या इमारतीचे आहेत.

लोढा समूहाचे स्पष्टीकरण

"शांती उपवन' ही इमारत लोढा/मॅक्रोटेक डेव्हलपर्सने विकसित केलेली नाही. शांती उपवन ही इमारत २० वर्षांपूर्वी बांधण्यात आली होती. 'लोढा हेवन' नावाच्या विकासाशी आमचा संबंध नाही. आम्हाला रहिवाशांप्रती सहानुभूती असून आम्ही आवश्यक असलेली कोणतीही मदत देण्यास तयार आहोत”, असे कंपनीच्या प्रवक्त्यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT