Lok Sabha Election 2024 facilities provided by the Election Commission at the polling station for voters  
मुंबई

Lok Sabha Election 2024 : मतदान केंद्रावरील निवडणूक आयोगाने दिलेल्या सुविधांचा मतदारांना दिलासा

अपंग, वृध्द लहान मुलांना घेऊनयेणाऱ्या नागरिकांना व महिलांना बसण्याची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था,फॅनची व्यवस्था ही मतदान केंद्रावर करण्यात आली होती.

आरती मुळीक-परब

दिवा : भर उन्हाळ्यात मुंबई-ठाण्यातील मतदान ठेवल्याने त्याची झळ दिव्यातील मतदारांना बसू नये यासाठी मतदान केंद्रावर रांगेतील उभ्या मतदारांसाठी मंडप उभारण्यात आले आहेत. अपंग, वृध्द लहान मुलांना घेऊनयेणाऱ्या नागरिकांना व महिलांना बसण्याची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था,फॅनची व्यवस्था ही मतदान केंद्रावर करण्यात आली होती.

दिव्यातील सहा झोन मध्ये जास्तीत जास्त मतदान केंद्रे ही पालिका आणि खाजगी शाळांमध्ये आहेत. तेथे मतदार मतदानाता हक्क बजावण्यासाठी आल्यावरत्यांना उन्हापासून संरक्षण होण्यासाठी तसेच ते उन्हामुळे आजारी पडू नये यासाठी दिव्यातील 6 झोनमधील शाळांमधील मतदान केंद्रांवर लांबच्या लांब मंडप उभे केलेहोते. त्या मोठ्या मंडपांमुळे मतदारांना उन्हाचा तडाखा कमी बसला. तसेच मोठे मंडप असल्यानेत्याच्या खाली हवा खेळती राहिल्याने नागरिकांनी भर उन्हातही मतदानाचा हक्क बजावला.तसेच दिव्यातील अपंग, वृध्द लहान मुलांना घेऊन येणाऱ्या नागरिकांना व महिलांनाबसण्याची व्यवस्था, सर्व नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, फॅनची व्यवस्था ही मतदान केंद्रावर करण्यात आली होती.

मतदारांच्या माहितीसाठी असलेल्या मतदार सहाय्यता केंद्राचा ही नागरिकांना फायदा झाला. दिव्यातील प्रत्येत नागरिकाच्या घरी मतदारांची माहितीअसलेली पावती वेळेत घरी न पोहोचल्याने त्यांचा एकच गोंधळ उडाला होता. पण मतदान केंद्रावरमतदारांचा यादीतील नाव, भागक्रमांक, अनुक्रमांक तसेच कोणते मतदान केंद्र आहे, हे कळण्यासाठी त्या भागातील बीएलओ व त्यांची संपूर्ण टिम मतदान केंद्रावर उपस्थित राहिल्याने मतदारांना मदतच झाली.

मतदार सहाय्यता केंद्रातही पुरेशा प्रमाणात सुविधा देण्यात आल्या होत्या. मतदारांना मतदान केंद्र सापडावे, यासाठीकिमान 4 दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत. हेदिशादर्शक फलक संबंधित मतदान केंद्रात नोंदणी असलेल्या मतदार राहत असलेल्या ठिकाणीप्रमुख चौकात लावण्यात आले होते. त्यावेळीउमेदवार प्रतिनिधींसाठी त्याचबरोबर निवडणुकीचे कामकाज करणाऱ्या कर्मचारी वर्गासाठीपुरेशा प्रमाणात टेबल, खुर्च्या व रांगेतील उभा असणाऱ्यामतदारांना बसण्यासाठी मतदान केंद्रावर पुरेसे खुर्च्या/बाक उपलब्ध करून दिल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

OYO Hotels: ओयो हॉटेलमध्ये एक तासात नेमकं काय होतं? सरकार अभ्यास करणार? सुधीर मुनगंटीवरांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केला

Latest Maharashtra News Updates : मुक्ताईनगर तालुक्यातील पूर्णाड चौफुलीवर असलेल्या अतिक्रमण काढले

ENG vs IND: इंग्लंडच्या रस्त्यावर आकाश दीपचा दरारा! इंग्रज गात आहेत नवा नारा; Video व्हायरल

Stock Market Closing: सेन्सेक्स 9 अंकांच्या वाढीसह बंद; FMCG आणि रिअल्टी शेअर्स वधारले, 'हे' शेअर्स बनले टॉप गेनर्स

Xi Jinping: जिनपिंग यांच्या अधिकारात बदल शक्य; विकेंद्रीकरणाचे माध्यमांत वृत्त; नेतृत्वाच्या बदलाचीही रंगली चर्चा

SCROLL FOR NEXT