mns campaign bike rally Sakal
मुंबई

Lok Sabha Election : मनसेचे डोंबिवली आणि कल्याण ग्रामीण मध्ये शक्ती प्रदर्शन

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती व महाविकास आघाडीतील पक्षांची मोर्चेबांधणी व प्रचारास सुरवात झाली आहे. मनसेने अद्याप आपली भूमिका स्पष्ट केली नसून पाडव्याला मनसे अध्यक्ष ती जाहीर करणार आहेत.

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती व महाविकास आघाडीतील पक्षांची मोर्चेबांधणी व प्रचारास सुरवात झाली आहे. मनसेने अद्याप आपली भूमिका स्पष्ट केली नसून पाडव्याला मनसे अध्यक्ष ती जाहीर करणार आहेत.

त्या अगोदर कल्याण ग्रामीण व डोंबिवलीत रविवारी मनसेच्या वतीने नवचैतन्य रॅली काढत एक प्रकारे शक्ती प्रदर्शन केले. मनसेचे हे शक्तिप्रदर्शन नेमके काय दर्शवते ? कल्याण लोकसभेत उमेदवार देणार का अशी चर्चा आता रंगू लागली आहॆ.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने डोंबिवली आणि कल्याण ग्रामीण मध्ये नवचैतन्य रॅलीचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. सदर रॅलीत मोठ्या संख्येने महाराष्ट्र निर्माण सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

लोकसभा निवडणुकीच्या तारखा या जाहीर झाल्या असून सर्वच राजकीय पक्ष आपल्या पक्षाची मोर्चे बांधणी करत आहे. नवचैतन्य बाईक रॅलीतून एक प्रकारे कल्याण लोकसभेत मनसे तर्फे शक्ती प्रदर्शन करण्यात आले.

मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा उत्साह पाहता पाडव्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपली भूमिका मांडताना लोकसभा निवडणूक लढवणे व उमेदवारांची घोषणा करणार का ? कल्याण च्या जागेवर मनसे दावा करणार का अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुरुंगात असलेल्या आदेंकरांच्या घरातील दोघींना राष्ट्रवादीची उमेदवारी, अजितदादांनी दिले एबी फॉर्म

Sangli Election : काँग्रेससोबत बोलणी सुरूच; अन्यथा वंचित २१ जागांवर ‘गॅस सिलिंडर’वर रणांगणात

Latest Marathi News Live Update : जागा वाटपाची चर्चा फिसकटल्याने पिंपरी चिंचवड शहरात भाजप शिवसेना युती तुटली : श्रीरंग बारणे

Boxer Car Accident: दिग्गज बॉक्सरचा गंभीर अपघात, वेगात कार ट्रकवर आदळली; दोघांचा जागीच मृत्यू; Video

'मासिक पाळीच्या काळातही करायचा लैंगिक अत्याचार, घरात नग्न फिरायचा अन् महिलांकडं अश्लील...'; HR मॅनेजरची पतीविरोधात तक्रार

SCROLL FOR NEXT