lok sabha election mokhada activist join bjp ravindra chavan politics Sakal
मुंबई

Mumbai News : पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मोखाड्यातील शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

लोकसभा निवडणुकीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांमध्ये घडामोडी देखील सुरू झाल्या आहेत. भाजपने पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात विविध पक्षांना सुरुंग लावत, मोठे इनकमिंग सुरू केले आहे.

सकाळ वृत्तसेवा

मोखाडा - लोकसभा निवडणुकीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांमध्ये घडामोडी देखील सुरू झाल्या आहेत. भाजपने पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात विविध पक्षांना सुरुंग लावत, मोठे इनकमिंग सुरू केले आहे.

डहाणू येथे झालेल्या एका कार्यक्रमात मोखाड्यातील राष्ट्रवादी काँग्रेस तसेच शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा भाजप नेते रवींद्र चव्हाण, भाजपा पालघर जिल्हाध्यक्ष भरत भाई राजपुत, लोकसभा निवडणूक प्रमूख नंदकुमार  पाटील भाजपात प्रवेश दिला आहे. त्यामुळे मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. 

या कार्यक्रमास विक्रमगड विधानसभा निवडणूक प्रमुख डॉ.हेमंत सवरा, भाजपा मोखाडा तालुका अध्यक्ष.संतोष चोथे , पालघर जिल्हा सचिव विठ्ठल पाटील, आदिवासी आघाडी जिल्हाध्यक्ष मिलिंद  झोले,.जयराम नीसाळ यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना ( शिंदे गट) , राष्ट्रवादी काँग्रेस व इतर पक्षांतील मोखाडा तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी , लोकप्रतिनिधी,  उपसरपंच , ग्रामपंचायत सदस्य यांनी डहाणू येथे पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे.

या प्रवेशात मोखाड्यातील साखरी ग्रा. प. मधील .राजू माळी,.संतोष भोरे, व यांसह असंख्य कार्यकर्ते , खोच ग्रा.प. मधील.एकनाथ पवार ( मा.सरपंच ) व शिवसेना तालुका संघटक,.गोरख सावरा,.गंगाधर पाटील यांसह कार्यकर्ते ,

वाशाळा ग्रा प मधील शिवसेनेचे .जयपाल पाटील, अंकुश लाहांगे, मोऱ्हांडा ग्रा. प. मधील सरपंच.देविदास निसाळ यांच्या माध्यमातून.हनुमंत भुसारा,.यशवंत पवार , जयराम कडू,.भास्कर निसाळ , .यशवंत भोये,.गणपत भोये .

नकुल भोये, अंबादास भोये,. वसंत चौधरी व वाकीचापाडा येथील ग्रामस्थ , चास ग्रा. प मधील.अजय दखने.पुंडलिक हमारे,.संदीप बरफ,.भीमा किरकिरे .भास्कर खुताडे, आसे ग्रा. प. मधील भोवाडी येथील.तुळशीराम बांबरे, देवीदास धोंडगे,. ईनुस पढेर यांच्या माध्यमातून असंख्य कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केला या सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांचे भाजपा मोखाडा तालुकाध्यक्ष संतोष चोथे यांनी स्वागत केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT