Lok Sabha Election  Sakal
मुंबई

Lok Sabha Election : उमेदवारांची प्रचार रॅली आणि डोंबिवलीकरांची वाहन कोंडी!

कल्याण लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे.

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - कल्याण लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे. उमेदवार शक्ती प्रदर्शन करत निवडणूक कार्यालय गाठत असल्याने यामुळे शहरात वाहन कोंडीचा ताप डोंबिवलीकरांना सहन करावा लागत आहे.

उन्हाच्या कडक झळांनी नागरीक हैराण झाले असताना या वाहन कोंडीत आगीच्या झळा सहन करत अर्धा अर्धा तास ताटकळत उभे रहावे लागत आहे. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतुकीत ऐन वेळेला बदल करण्यात आले आहेत. घरडा सर्कल येथे वाहनांना प्रवेश बंदी देण्यात आल्याने चालकांना मोठा वळसा घालावा लागत आहे. यामुळे चालकांमध्ये नाराजीचे वातावरण दिसून आले.

कल्याण लोकसभा निवडणूकीत उमेदवार आपले नशीब आजमावित आहेत. या मतदारसंघात आत्तापर्यंत 19 उमेदवार, प्रतिनिधींना 28 नामनिर्देश पत्र वाटप करण्यात आले आहे. तर 3 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत.

मंगळवारी शिवसेना ठाकरे गटाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर यांनी आपला उमेदवारी अर्द दाखल केला. यावेळी महाविकास आघाडीकडून शक्तिप्रदर्शन करत भव्य अशी रॅली काढण्यात आली.

या रॅलीमुळे शहरात चार रस्ता, टिळक चौक, टिळक रोड, मंजुनाथ शाळा, शेलार नाका, घरडा सर्कल आदि परिसरात मोठ्या प्रमाणात वाहन कोंडी झाली होती. या वाहन कोंडीचा फटका रुग्णवाहिकांना देखील बसला.

परंतू रुग्णवाहिकेला नंतर तात्काळ रॅलीतून मार्ग काढून देण्यात आला. अर्धा अर्धा तास वाहन कोंडीत वाहने खोळंबल्याने वाहन चालक त्रस्त झाले होते. निवडणूक लढवतात मात्र सर्वसामान्य नागरिकांना का वेठीस धरता ?

असा संतप्त सवाल यावेळी नागरिक कार्यकर्त्यांना करत होते. वाहन कोंडीत वाहन अडकल्याने नोकरदार वर्गाला त्याचा फटका बसला, काही नागरिकांनी रिक्षा तेथेच सोडून चालत जाऊन स्टेशन गाठले. यावेळी मिडीयाला नागरिकांना होणारा त्रास देखील दाखवा असे बोल लगावले गेले.

- शहरात टिळक चौक, मंजुनाथ शाळा आदि ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहन कोंडी झाली. या ठिकाणी कोठेही वाहतूक पोलिस दिसून आले नाही. घरडा सर्कल येथे मात्र वाहतूक पोलिसांची मोठी गर्दी दिसून आली.

- वाहतूक पोलिसांच्या योग्य नियोजनाच्या अभावी डोंबिवलीकरांना वाहन कोंडीचा ताप सहन करावा लागत आहे

- भर उन्हात वाहनांना मार्ग दाखवून वाहतूकीचे नियोजन करताना वाहतूक पोलिसांच्या देखील नाकी नऊ आल्याचे दिसून आले.

- घरडा सर्कल, बंदिश पॅलेस येथे वाहनांना बंदी घालण्यात आल्याने वाहन चालकांना एमआयडीसी परिसरातून वळसा घालून डोंबिवलीत यावे लागत होते. त्यामुळे वाहन चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin September Installment : लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! सप्टेंबरचा हप्ता 'या' दिवशी खात्यात होणार जमा; 1 कोटी 66 लाख महिलांची प्रतीक्षा संपणार

Satara Leopard Attack: बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकल्याचा मृत्यू; वनधिकाऱ्यांना निलंबित करेपर्यंत पार्थिव ताब्यात घेणार नाही, नागरिकांचा आक्रमक पवित्रा

16 तास उपवास, रोज 6 KM चालणं; 61 व्या वर्षी निवेदिता 'असा' आहे सराफ फिटनेस मंत्रा? म्हणाल्या...

Latest Marathi News Live Update : उद्धव-राज ठाकरे मोर्चास्थळाकडे रवाना

Mumbai Local: तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक! प्रवाशांचे होणार हाल; वेळापत्रक पाहूनच बाहेर पडण्याचे आवाहन

SCROLL FOR NEXT