Uddhav Thackeray sakal
मुंबई

Loksabha Election 2024 : अवकाळी पावसामुळे उद्धव ठाकरेंची डोंबिवलीतील सभा रद्द

डोंबिवलीत आलेल्या अवकाळी पावसामुळे सोमवारी होणारी उद्धव ठाकरे यांची सभा रद्द करण्यात आली आहे.

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - डोंबिवलीत आलेल्या अवकाळी पावसामुळे सोमवारी होणारी उद्धव ठाकरे यांची सभा रद्द करण्यात आली आहे. सायंकाळी पाऊस थांबला असला तरी सभेच्या ठिकाणी असलेले साउंड सिस्टीम, स्टेज भिजल्याने ही सभा रद्द करण्यात आली असल्याची माहिती आहे.

इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीच्या कल्याण लोकसभेच्या उमेदवार वैशाली दरेकर राणे यांच्या प्रचारासाठी डोंबिवली पश्चिम येथील भागशाळा मैदान येथे सोमवारी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भिवंडी लोकसभेचे उमेदवार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांच्या प्रचारासाठी कल्याण पश्चिम येथे सभा घेतली.

यानंतर सोमवारी उद्धव ठाकरे यांच्या सभेचे आयोजन वैशाली दरेकर यांच्या प्रचारासाठी करण्यात आले होते. मात्र सोमवारी दुपारी अचानक वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस कल्याण डोंबिवली मध्ये पडला. अचानक आलेल्या पावसामुळे सभेच्या ठिकाणी असलेले सभा मंडप तसेच साउंड सिस्टीम भिजली आहे.

पावसास सुरवात झाली तेव्हाच उद्धव ठाकरे यांची सभा होणार का? याची चर्चा सुरू झाली. शरद पवार यांच्या सारखेच उद्धव ठाकरे देखील भर पावसात सभा घेतील असे शिवसैनिक बोलत होते. मात्र साऱ्यांचाच हिरमोड झालं आहे.

अवकाळी पडलेल्या मुसळधार पावसामुळे आणि खराब, अंधुक, वादळी वातावरणामुळे आयोजित महासभा रद्द करण्यात आली आहे. सर्व संबंधितांनी याची नोंद घ्यावी आणि आपापल्या पक्षातील, प्रभागातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना कळवावे अशी सूचना शिवसेना ठाकरे गटाकडून सांगण्यात आली आहे.

उमेदवारांना प्रचारासाठी आता अवघे 5 दिवस राहिले आहेत. त्यामुळे कल्याण लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्यासाठी पक्ष प्रमुखांची रद्द झालेली सभा पुन्हा कधी होते यावर चर्चा सुरू झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Shinde vs Thackeray Group : मिरजेत ठाकरे-शिंदे गटात कमानी ‘युद्ध’; दिशा सालियन प्रकरणाला ‘गद्दारी’वरुन प्रत्‍युत्तर, पोलिस परवानगीने आश्चर्य

Kolhapur Ganesh Idol Collapse : कोल्हापुरात मानाची २१ फुटी गणेशमुर्ती कोसळली, वीजवाहिनीचा धक्का लागला अन् गोखले कॉलेज चौकातील घटना

Bomb Detection Squad Miraj : मिरजेत गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी अचानक बॉम्ब शोधक पथक, श्वानपथकाकडून मिरवणूक मार्गाची तपासणी; शहरातील प्रमुख मार्ग बंद

Maharashtra Ganesh Visarjan Live: शेटफळ तलावामध्ये पाणी सोडण्याचा निर्णय- हर्षवर्धन पाटील

Bhiwandi News: माझ्या मुलाला फाशी द्या! भिवंडीतील हाय-प्रोफाईल सामूहिक अत्याचाराच्या प्रकरणात आईची मागणी

SCROLL FOR NEXT