Loksabha Election Voting sakal
मुंबई

Loksabha Election 2024 : दिंडोरीमध्ये उत्साह; देशात ५८ टक्के मतदान

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी देशातील ४९ मतदारसंघांमध्ये आज मतदान झाले. राज्यातील या अखेरच्या टप्प्यात १३ मतदारसंघांमध्ये मतदारांनी आपला हक्क बजावला.

सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

मुंबई, नाशिक - लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी देशातील ४९ मतदारसंघांमध्ये आज मतदान झाले. राज्यातील या अखेरच्या टप्प्यात १३ मतदारसंघांमध्ये मतदारांनी आपला हक्क बजावला. मुंबईत मतदानासाठी लांबच लांब रांगा लागल्याने विरोधकांनी निवडणूक आयोगाच्या नियोजनावर टीका केली. संध्याकाळपर्यंत देशात ५७.६४ टक्के मतदान झाले होते. सर्वाधिक मतदान पश्‍चिम बंगालमध्ये, तर सर्वांत कमी मतदानाची नोंद महाराष्ट्रात झाली.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, स्मृती इराणी, लोजपचे नेते चिराग पासवान, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते उमर अब्दुल्ला, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे या प्रमुख नेत्यांचे भवितव्य मतदानयंत्रात बंद झाले. राज्यात मुंबईतील सहा मतदारसंघांसह एकूण १३ मतदारसंघांमध्ये मतदान झाले.

या टप्प्यात प्रचाराचा केंद्रबिंदू मुंबई हाच राहिल्याने आणि येथील काही लढतींना ‘शिवसेना विरुद्ध शिवसेना’ असा रंग असल्याने येथील मतदानाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष होते. राज्यात संध्याकाळपर्यंत दिंडोरी मतदारसंघात सर्वाधिक मतदान झाले होते. मतदान केंद्रांवरील गर्दी, मतदान केंद्रांवर पिण्याच्या पाणी नसणे, धिम्या गतीने होणारे मतदान यामुळे काही नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.

मतदानासाठी दोन तासांहून अधिक वेळ लागल्याने काही जण घरी गेले आणि त्यातील काही जण नंतर पुन्हा मतदानासाठी आले, अशाही घटना घडल्या. संध्याकाळी मतदान केंद्रांवर गर्दी झाल्याने मतदान रात्री नऊ वाजल्यानंतरही सुरू होते. त्यामुळे आधीच्या चार टप्प्यांप्रमाणेच संध्याकाळनंतर मतदानाची टक्केवारी वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

देशातील मतदान (टक्क्यांमध्ये)

  • एकूण - ५७.६४

  • बिहार - ५२.९३

  • झारखंड - ६३.०६

  • महाराष्ट्र - ४९.१५

  • ओडिशा - ६१.१०

  • उत्तर प्रदेश - ५७.७९

  • पश्‍चिम बंगाल - ७३.०६

  • लडाख - ६७.१५

  • बारामुल्ला - ५५.२०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नवी मुंबईत गोळीबाराचा थरार! इसम बाईकवरून आला, समोरच्या व्यक्तीवर गोळ्या झाडल्या अन्...; संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद

Maharashtra Weather: यंदाचा उन्हाळा ठरणार ‘विरोधाभासी’! उन्हाच्या कडक चटक्यांसह सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज, आरोग्याबरोबरच शेती क्षेत्रावरही संकट..

विराट कोहलीला धुरंधर चित्रपट पाहून काय वाटलं? स्पेशल पोस्ट करत म्हणाला, 'मी भारतात कधीच याआधी...'

खरातशी कनेक्शन; IAS सह DCP, ACP दर्जाच्या महिला अधिकारीही गोत्यात येण्याची शक्यता, आवडत्या पोस्टिंगसाठी...

Why Gold Prices Falling During War : गुंतवणूकदार चक्रावले! सोन्यात 22 हजार तर चांदीत 58 हजारांची विक्रमी घसरण; खरेदीसाठी हीच योग्य वेळ?

SCROLL FOR NEXT