Nana Patole Sakal
मुंबई

Nana Patole : मोदींचा मुस्लिम द्वेष पुन्हा दिसला

‘मुस्लिमांशी आपले नाते घट्ट आहे व मतांसाठी आपण काम करत नाही असे सांगणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी पुन्हा जाहीर सभेत राम मंदिर व मुस्लिम द्वेषावर भाषण केले.

सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

मुंबई - ‘मुस्लिमांशी आपले नाते घट्ट आहे व मतांसाठी आपण काम करत नाही असे सांगणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी पुन्हा जाहीर सभेत राम मंदिर व मुस्लिम द्वेषावर भाषण केले. देशातील जनता मोदींच्या थापेबाजीला बळी पडणार नाही,’ असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी बुधवारी स्पष्ट केले.

कल्याण येथे आज मोदी यांची प्रचारसभा झाली. सभेतील भाषणावर प्रतिक्रिया देताना पटोले यांनी त्यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, ‘काँग्रेसच्या जाहिरनाम्याबाबत मोदी बिनबुडाचे आरोप करत आहेत. मुस्लिमांना संपत्ती वाटणार हे जाहीरनाम्यात कुठेच नाही. असे असतानाही काँग्रेस मुस्लिमांना संपत्ती वाटणार असा अपप्रचार मोदी करीत आहेत.

आरक्षणाच्या मुद्द्यावरही त्यांनी केलेले आरोप खोटे आहेत. आरक्षणाला ‘आरएसएस’ व भाजपचाच विरोध आहे. हे उघड असताना काँग्रेस एएसी, एसटी व ओबीसींचे आरक्षण काढून मुस्लिमांना देणार असा अपप्रचार करीत आहेत.’

मोदी व भाजपची असंवेदनशीलता

घाटकोपर भागात होर्डिंग दुर्घटनेत १४ नागरिकांचा बळी गेला आहे. परंतु भाजप व नरेंद्र मोदी यांना या घटनेचे काहीही गांभीर्य नाही. ज्या घाटकोपर भागात ही घटना घडली त्याच भागातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘रोड शो’ होतो हे संतापजनक आहे. यातून पंतप्रधान मोदी व भाजपची असंवेदनशीलता दिसून येते, असेही नाना पटोले म्हणाले.

भाजपच्या पराभवाची चिंता करावी

काँग्रेस विरोधी पक्षही बनू शकणार नाही, उद्धव ठाकरेंची शिवसेना व शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नकली असेल तर या पक्षांची एवढी चिंता करण्याची मोदी यांना काय गरज आहे? वास्तविक पाहता भारतीय जनता पक्षाचा लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव होईल, या चिंतेने त्यांची झोप उडाली आहे. या भीतीपोटी ते काहीही बोलत आहेत. काँग्रेसचे दुकान बंद होण्याची चिंता करण्यापेक्षा नरेंद्र मोदी यांनी त्यांची व भाजपच्या पराभवाची चिंता करावी, असेही नाना पटोले म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT