team omi kalani and mp shrikant shinde sakal
मुंबई

Ulhasnagar News : टीम ओमी कलानी-खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या दोस्तीका गठबंधनाची स्टिकर्स झळकली

डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा फुटला नारळ.

दिनेश गोगी

उल्हासनगर - ओमी कलानी यांनी महायुतीतील कल्याण लोकसभेचे शिवसेना उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांना बिनशर्त पाठींबा दिला आहे. दोस्तीच्या या पाठिंब्यामुळे शिवसेना वगळून महायुतीतील घटक पक्षांमध्ये वादाची ठिणगी पडली असतानाच, उल्हासनगरातील टीम ओमी कलानी आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या दोस्तीका गठबंधनाची स्टिकर्स झळकली आहेत. या स्टिकर्सचे अनावरण करतानाच लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फुटल्याची प्रतिक्रिया डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

तीन चार दिवसांपूर्वी कलानी महलवर झालेल्या टीम ओमी कलानीच्या कार्यकर्ता मेळाव्यात दोस्तीच्या भावनेतून महाविकास आघाडीचा भाग असलेल्या कलानी परिवाराने डॉ. श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा दिला. तेंव्हा ओमी कलानी हे दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस असल्याची शाबासकी डॉ. शिंदे यांनी दिली होती.याच मेळाव्यात डम्पिंग ग्राउंड, भूमिगत वाहनतळ, दफनभूमी, धोकादायक इमारत, उत्तर भारतीय भवन, म्हारळ गाव ते वडोल गाव उन्नत महामार्ग अश्या सहा समस्या सोडविण्या संबंधी गॅरंटीची मागणी टीओकेकडून मनोज लासी यांनी केली.

पेट्रोल पंपावर बॅनर लावून जे गॅरंटी देतात त्यांच्यावर आमचा विश्वास नाही, आमचा विश्वास फक्त खासदार श्रीकांत शिंदेंवर असल्याची टिका मोदी यांचे नाव न घेता टीका टीओके प्रवक्ता कमलेश निकम यांनी केली होती. याबाबतची नाराजी महायुतीतील भाजप, रिपाई आठवले गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी व्यक्त करीत महायुतीच्या जव्हार हॉटेल येथे पार पडलेल्या समन्वय बैठकीत टिओकेचा बॉयकॉट केला होता. यावरून मास मीडियावर भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष भारत गंगोत्री, टीओकेचे कमलेश निकम, मनोज लासी आमनेसामने आले होते.

दरम्यान टीओकेच्या मेळाव्याला काही दिवस झाले असतानाच टीम ओमी कलानी-खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या दोस्तीका गठबंधनाची 5 हजार स्टिकर्स झळकली आहेत. कारच्या मागील काचेवर ही स्टिकर्स चिकटवण्यात येणार आहेत. त्यावर डॉ. श्रीकांत शिंदे,ओमी कलानी या दोघांची फोटो असून धनुष्यबाण ही निशाणी दिसत आहे.

डॉ. शिंदे यांनी या स्टिकर्सचे अनावरण त्यांच्या डोंबिवली निवासस्थाना समोर केले आहे. यावेळी जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे,उपजिल्हाप्रमुख अरुण आशान, टीओकेचे कमलेश निकम, मनोज लासी, नरेंद्रकुमारी ठाकूर, अजित माखिजानी, संतोष पांडे, अवि पंजाबी, सुंदर मुदलियार आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘हेरा फेरी’चा हिरो आता बिझनेसमन! सुनील शेट्टीने जावई आणि ल्योकासोबत उभारला नवीन व्यवसाय, महिलांसाठी खास वस्तू आणली बाजारात

Afghanistan Earthquake : अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाच्या धक्क्याने हादरले, ७ मृत्युमुखी, २०० पेक्षा जास्त जखमी, भारतातही जाणवले धक्के

ICCपेक्षा BCCIकडून जास्त बक्षीस! भारतीय महिला संघासह सपोर्ट स्टाफ होणार मालामाल

DCB Bank Job : जिल्हा बँकांच्या भरतीत स्थानिकांना प्राधान्य, राज्य शासनाचा निर्णय; सत्तर टक्के जागा राखीव ठेवण्याचे आदेश

Nagpur Fake Teacher ID Scam: ६७२ बोगस शिक्षकांकडून होणार वेतनाची वसुली? सायबर पोलिस करणार न्यायालयात मागणी

SCROLL FOR NEXT