Nareshkumar Gupta sakal
मुंबई

Nareshkumar Gupta : कोलकत्याहून निघालेला साठ वर्षाचा अवलिया बिकेसीच्या सभेत आकर्षण

मतदान खूपच महत्त्वाचे असते हे मतदान प्रत्येकाने करावे, असे आवाहन करण्यासाठी कोलकात्याहुन मुंबईला पोचलेले नरेश कुमार गुप्ता यांनी बीकेसी येथील महविकास आघाडीच्या सभेत लक्षवेधी ठरले.

सकाळ वृत्तसेवा

भारतामध्ये सत्ता कोणाची ही, परंतु मतदान हा आपला हक्क आहे, त्या एका मतावरच आपण आपली सरकार निवडतो. त्यामुळे मतदान खूपच महत्त्वाचे असते हे मतदान प्रत्येकाने करावे, असे आवाहन करण्यासाठी कोलकात्याहुन मुंबईला पोचलेले नरेश कुमार गुप्ता यांनी बीकेसी येथील महविकास आघाडीच्या सभेत लक्षवेधी ठरले. दोन दिवसापूर्वी ठाणे जिल्ह्यातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेमध्ये देखील ते सहभागी झाले होते. त्या ठिकाणीही मतदान करण्यासाठी संदर्भातील आपली प्रचार मोहीम जोरात राबवली.

प्रत्येकाने मतदान करावा, आपल्या मतदानाचा हक्क बजावा, हा संदेश बेंगोली हिंदी, तामिळ आधी भाषांमध्ये लिहून त्याची मोठी टोपी करून आणि अंगावर मतदानाविषयीचे संदेश देत नरेश कुमार गुप्त आहेत मुंबईतील महाविकास आघाडीच्या सभेत मतदान करण्याच्या प्रचारासाठी पोहोचले. लोकांनी मोठ्या प्रमाणात मतदान करावे हा एकच संदेश घेऊन आपण देशभर फिरत असल्याचे त्यांनी सांगितले.

मागील 19 वर्षांपासून राज्यातील आणि देशातील निवडणुका सुरू झाल्यास आपण देशभरातील विविध राज्यांमध्ये शहरांमध्ये फिरत असते. या माध्यमातून प्रत्येकाने मतदान करावे यासाठी आपण आवाहन करतो या आवाहनाला खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असतो.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपला हा प्रवास  कोलकाता येथून सुरू झाला.  दिल्ली, अहमदाबाद आदी शहर आणि अनेक राज्यातील फिरत मुंबईत पोचलो असून मुंबईमध्ये मतदानाविषयीची जागरूकता अत्यंत चांगल्या प्रमाणात असल्याची आपल्याला दिसून आल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईकर अत्यंत मनस्वी स्वभावाचे, आणि ऐकून घेण्याची मनस्थिती असल्याचे आपल्याला दिसले.

मुंबईत बांद्रा येथील या सभेमध्ये प्रत्येक पक्षातील सदस्यांनी आपल्या मतदानासंदर्भातील मोहिमेला पाठिंबा देत आपले स्वागत केले. महाराष्ट्राची भूमी हीच एक विचाराची आणि महापुरुषांची भूमी आहे. स्वातंत्र्यसंग्राम आणि एकूणच परिवर्तनाचे विचार या भूमीने दिले आहेत. या भूमीने देशाला संविधान दिले हे संविधान वाचविण्यासाठी आणि लोकशाही अबाधित राहण्यासाठी प्रत्येकाने मतदान करावे असे आवाहन देखील त्यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bharat Gogawale on Manoj Jarange Patil : "कोणी ऐऱ्यागैऱ्याने त्याचे श्रेय घेऊन ठाण्याला आव्हान देऊ नये,”, भरत गोगावलेंचे मनोज जरांगेंवर थेट आरोप

Fertilizer Allocation System : आधार, सातबारा अन् पिकानुसार ठरणार खतांचा कोटा ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ प्रणाली; वाळवा पंचायत समितीत खत विक्रेत्यांना प्रशिक्षण

Asian Games 2026: दीपिका सेहरावतचे रेकॉर्ड ब्रेकिंग गोल! थायलंडवर २०-१ असा दणदणीत विजय; १९८२ नंतर सुवर्णपदकाच्या शोधात

Marathi News Live Updates : पक्ष फोडणाऱ्या टोळीचे मुख्य सूत्रधार ज्ञानेश कुमारच, त्यांचा तातडीने राजीनामा घ्या; उद्धव ठाकरे आक्रमक

Uddhav Thackeray Eknath Shinde : वसंत डावखरे मानहानी प्रकरणाचा १७ वर्षांनी निकाल; उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंबाबत कल्याण न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

SCROLL FOR NEXT