Uddhav Thackeray sakal
मुंबई

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

राज्यातील शेवटच्या टप्प्यातील मतदान आज पार पडले. मतदान प्रक्रिया पार पडत असताना मतदानासाठी विलंब होत असल्याच्या तक्रारी ठाकरे गटाकडे आल्या होत्या.

सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

मुंबई - ‘मुंबईतील मतदार मतदानासाठी रांगा लावून उभा आहे. मात्र, मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून जाणीवपूर्वक विलंब केला जात आहे,’ असा आरोप ‘शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे’ पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत बोलताना केला. ‘मोदी सरकार पराभवाच्या भीतीने निवडणूक आयोगाचा घरगड्यासारखा वापर करत आहे. आयोगाचा हा पक्षपातीपणा असून मतदानाला होणारा विलंब क्षमा करता येण्यासारखा नाही,’’ अशी टीकाही ठाकरे यांनी केली.

राज्यातील शेवटच्या टप्प्यातील मतदान आज पार पडले. मतदान प्रक्रिया पार पडत असताना मतदानासाठी विलंब होत असल्याच्या तक्रारी ठाकरे गटाकडे आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आज तातडीने पत्रकार परिषद घेऊन संथगतीने सुरू असलेल्या मतदानाबद्दल संताप व्यक्त केला. यावेळी त्यांनी मोदी सरकार आणि निवडणूक आयोगावर टीका करताना आयोगाचा उल्लेख ‘घरगडी’ असा केला.

न्यायालयात दाद मागणार

‘शिवसेना ठाकरे गटाला जेथे जास्त मतदान होणार आहे किंवा आघाडी मिळत आहे अशा ठिकाणी विलंब लावला जात आहे. त्यामुळे मतदारांनी जाणीवपूर्वक विलंब लावणाऱ्या निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधींची तसेच उमेदवारांच्या प्रतिनिधींची नावे घेऊन त्याची माहिती जवळच्या शिवसेना शाखेमध्ये द्यावी. मतदानासाठी विलंब लावणाऱ्या या प्रतिनिधींची नावे आपण पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जाहीर करू. तसेच याप्रकरणी न्यायालयात दाद मागितली जाईल,’’ असा इशारा ठाकरे यांनी दिला.

ठाकरे म्हणाले,

- प्रतिनिधींकडूनच मतदानासाठी जाणीवपूर्वक विलंब

- विशिष्ट वस्त्यांमध्ये नावे खूप वेळा तपासली जात आहेत

- ज्येष्ठ मतदारांना त्रास; केंद्रांवर कसलीही सोय नाही

- नागरिकांनी मतदानाला उतरू नये हा सरकारचा डाव

- अगदी शेवटच्या मतदाराने मतदानासाठी आग्रही राहावे

आम्हीच प्रथम तक्रार केली - फडणवीस

‘‘मुंबईत संथगतीने मतदान होत असल्याची तक्रार सर्वप्रथम आम्हीच निवडणूक आयोगाकडे केली होती. आता मात्र नेहमीप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी त्यांचे रडगाणे सुरू केले आहे. पराभव समोर दिसत असताना त्यांनी सवयीप्रमाणे मोदींवर आरोप करणे प्रारंभ केले आहे,’’ असा दावा भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ते म्हणाले,‘‘ उद्धव ठाकरे हे चार जूननंतरच्या स्थितीला सामोरे जाण्याची पार्श्वभूमी आताच तयार करीत आहेत. शिवाय निवडणूक प्रक्रियेतील अधिकाऱ्यांना धमक्याही दिल्या जात आहेत.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

Pune News : ‘करमाफी’चे अधिकार अधिकाऱ्यांना देण्याचा घाट; विरोधकांचा तीव्र विरोध

Gangapur Crime : मुलीच्या प्रेमविवाहास मदत करणाऱ्या युवकाचा खून करणाऱ्या पाच आरोपींपैकी तीन जणांना जन्मठेपेची शिक्षा

Sindkhed Raja Crime : अवैध बायोडिझेल साठ्यासह २ लाख १९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त; समृद्धी महामार्ग लगत सुरू होती विक्री

SCROLL FOR NEXT