मुंबई

Lokshabha 2024 : ''जो आमच्या समस्या सोडवणार त्यांनाच आम्ही मतदान करणार'', चांदिवली सिटिझन वेल्फेअर असोसिएशनच्या सदस्यांचा जाहीरनामा

सकाळ वृत्तसेवा

निलेश मोरे

घाटकोपरः लोकसभा निवडणुकीत सगळेच पक्ष आपापले स्वतंत्र जाहीरनामे प्रकाशित करून ते सोडविण्याचे आश्वासन मतदारांना करत आहेत तर दुसरीकडे मतदान करणाऱ्या जागृत नागरिकांनी आता स्वतःच आपल्या विधानसभा क्षेत्रातील विविध समस्यांचा लेखाजोखा उमेदवारांसमोर मांडला आहे. चांदिवली सिटिझन वेल्फेअर असोसिएशन या संस्थेच्या स्थानिक सदस्यांनी चांदिवली परिसरात भेडसावणाऱ्या विविध समस्या जाहिरनाम्यात मांडल्या असून जे उमेदवार आमच्या समस्या सोडवतील त्यांनाच आम्ही मतदान करू असा विचार यंदाच्या लोकसभा निवडणुकीत चांदिवलीतील नागरिकांनी केला आहे.

या आहेत चांदिवलीतील प्रमुख समस्या

चांदिवली विधानसभेत वाहतूक कोंडी आणि अस्वच्छता ही एक मोठी समस्या बनत आहेत. साकीनाका जंक्शन , कुर्ला ते साकीनाका दरम्यान होणारी वाहतूक कोंडी नित्याचीच. रस्त्यारस्त्यावर पडलेला कचरा व त्यामुळे परिसरात होणारी दुर्गंधी विविध आजार निर्माण करत आहे. चांदिवलीतील भट्ट्या आणि रेडी सिमेंटच्या प्लांटमुळे होणारे प्रदुषण नागरिकांच्या आरोग्यासाठी घातक ठरत आहे. चांदिवलीत बऱ्याच झोपड्या ह्या डोंगराळ भागात येत असल्याने येथे उंच डोंगरावरून मातीचे भूस्खलन होणे , दरड कोसळणे असे प्रकार पावसाळ्यात घडत असतात. त्यामुळे येथील नागरिकांच्या मनात नेहमीच भीती असते. येथील काही मोठ मोठ्या सोसायटीतील काही रस्त्यावर ट्रक , टेम्पो , रिक्षा सरास पार्क होत असल्याने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न उभा राहत आहे.

चांदिवली सिटिझन्स वेल्फेअर असोसिएशनचा जाहीरनामा

चांदिवलीतील रहिवाशांनी एकत्र येत यंदाच्या लोकसभा निवडणुकीत आपला जाहीरनामा उमेदवार यांच्यासमोर निराकरण करण्यासाठी मांडला आहे.

1) वाहतूक कोंडी: डीपी योजनेनुसार डीपी रस्त्यांची अंमलबजावणी करण्यात अपयश

2) बेकायदेशीर भट्ट्या आणि रेडी मिक्स सिमेंट प्लांटमधून होणारे वायू प्रदूषण

3) उंच इमारतींच्या परिसरात असलेले मिनी फायर स्टेशन कुचकामी आहे

4) परिसरात झळकणारे बेकायदेशीर होर्डिंग्ज

5) फूटपाथ आणि रस्त्यावर फेरीवाल्यांचे अतिक्रमण

6) उघड्यावर कचरा टाकून होणारी दुर्गंधी

7) सहकारी गृहनिर्माण संस्थांवर आकारला जाणारा GST रद्द करणे किंवा दुरुस्त करणे

8) सार्वजनिक उद्यानांची देखभाल न करणे आणि मोकळ्या जागांचे अतिक्रमण

9 ) रहिवाशी भागाजवळ उभ्या केलेल्या ट्रक आणि बस सारख्या अवैध अवजड वाहनांच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाय

अश्या विविध समस्या चांदिवलीतील नागरिकांनी मांडल्या असून या समस्या जे उमेदवार सोडवतील त्यांचा आम्ही विचार करू आणि मतदान करू असा निर्णय यंदाच्या लोकसभा निवडणुकीत नागरिकांनी घेतला आहे. उत्तर मध्य मुंबई लोकसभेतून काँग्रेसने धारावीच्या आमदार वर्षा गायकवाड यांना तर भाजपने या मतदार संघातून दोन वेळा निवडून आलेल्या पूनम महाजन यांना डावलून पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाबच्या 26/11 चां खटला आणि इतर दहशतवादी खटल्या मधील सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे हे उमेदवार चांदिवली विधानसभेतील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन ते सोडवण्याच्या चर्चेत सहभागी होऊन नागरिकांना आश्र्वासित करतात का हेच पाहावे लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario: श्रेयस अय्यरचे शतक, जिंकूनही पंजाब किंग्सची प्ले ऑफमधील जागा पक्की नाहीच... जाणून घ्या समीकरण

IPL 2026 KKR Playoff Scenario : कोलकाता नाइट रायडर्ससमोर अवघड गणित! पंजाबला नेट रन रेटमध्ये मागे टाकायचे असेल तर...

थायलंडला जाणं महागणार! भारतीयांसाठी Visa Free Entry रद्द; नवीन नियम लागू, आता प्रवेश कसा मिळणार?

Arjun Tendulkar: अर्जुनसोबत चुकीची वागणुक, त्यात रिषभ पंतने 'पारा' चढवला... सचिनचा मुलगा संतापला; नेमकं काय घडलं?

Monsoon Progress Update : मॉन्सूनची प्रगती हवामान विभागाचा दुजोरा, काही तासात केरळात दाखल; अरबी समुद्राचा भाग व्यापला

SCROLL FOR NEXT