मुंबई

मुंबईकरांनी केली मनसोक्त गटारी साजरी; चिकण, मटणच्या दुकानांसमोर लांब रांगा

तेजस वाघमारे



मुंबई: येत्या मंगळवारपासून श्रावण महिना सुरू होत आहे. श्रावण सुरू होण्याच्या दोन दिवस अगोदर शेवटचा रविवार आल्याने मांसाहारप्रेमींनी रविवारी (ता.19) मनसोक्त गटारी साजरी केली. त्यामुळे सकाळपासूनच चिकन, मटण तसेच, वाइन शॉपबाहेर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

यंदाची आषाढी अमावस्या सोमवारी (ता.20) आहे. श्रावण सुरू होण्याआधी रविवार आल्याने अनेकांनी आजपासून सेलिब्रेशन सुरू करण्याचे नियोजन केले आहे. यातच लॉकडाऊनमुळे घरीच असल्याने मांसाहार प्रेमींमध्ये गटारीचा उत्साह ओसंडून वाहत आहे. त्यामुळे कोरोनाचे सावट असतानाही अनेकांनी गटारी साजरी करण्याचा बेत आखला होता. उलट लॉकडाऊन असूनही गटारी साजरी करण्याचा अनेकांचा उत्साह यंदाही कायम होता. लॉकडाऊनमुळे हॉटेल, बार बंद आल्याने अनेकांना मनसोक्त गटारीचा आनंद लुटला येत नसला तरी आपापल्या नियोजनानुसार मांसाहार प्रेमींनी रविवारी आनंदात गटारी  साजरी केली.

श्रावण सुरू होईपर्यंत सेलिब्रेशन
मुंबईतील बहुतांश नागरिक श्रावण महिन्यात मांसमटण वर्ज्य करतात. काही लोक गणपती विसर्जन होईपर्यंत मांसाहार टाळतात. श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी येणारी गटारी अमावस्या मटण, चिकन, मासे,  मद्यपान करून साजरी करण्याची अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे. त्यानुसार अनेकांनी श्रावण सुरू होईपर्यंत सेलिब्रेशन करण्याची तयारी केली आहे.

---------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे ) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'ठरलं तर मग' मधून लोकप्रिय अभिनेत्रीची एक्झिट? अनेक दिवसांपासून मालिकेतून आहे गायब, म्हणाली- तिथे...

Ram Navami 2026 horoscope: 'या' राशींच्या लोकांना रामनवमीच्या दिवशी होईल फायदा, करिअर अन् व्यवसायात चांगली बातमी मिळेल

Latest Marathi News Live Update : भोंदूबाबा अशोक खरातची SIT कडून सलग सातव्या दिवशी चौकशी

Cold Storage Blas: ड्यूप्लिकेट वीरप्पनला अटक! कोल्ड स्टोरेज स्फोटात योगी सरकारची मोठी कारवाई , कोण आहे माजी आमदार अन्सार अहमद

Firozabad to Kolhapur : काकणाचा चुडा, सौभाग्याचं लेणं; बांगड्यांच्या व्यापाराला कोल्हापुरात मोठी मागणी

SCROLL FOR NEXT