love jihad case SAkal
मुंबई

love jihad case : राज्यात लव जिहादचे ४०२ प्रकरण दाखल; लव जिहाद समिती रद्द करण्याची आमदार रईस शेख यांची मागणी

तत्कालीन मंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती चुकीची

सकाळ वृत्तसेवा

Mumbai News: तत्कालीन महिला व बाल विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी राज्यात लव जिहाद प्रकरणात १ लाख प्रकरण दाखल असल्याचे सांगितले होते. दरम्यान महिला बाल विकास विभागाने लव जिहाद समिती स्थापन केली होती.

या समितीने राज्यातील सर्व दाखल प्रकरणांचा अभ्यास करून तसा अहवाल सादर केला. ज्यामध्ये ४०२ प्रकरण दाखल असल्याचे माहिती अधिकाऱ्यांच्या माहिती मध्ये पुढे आले आहे. त्यामुळे आता ही समिती बरखास्त करण्याची मागणी भिवंडीचे समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी केली आहे.

यासंबंधीत शेख यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महिला बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांना निवेदन दिले आहे. ज्यामध्ये राज्यातील लव जिहाद च्या ४०२ तक्रारी मध्ये केवळ दोन विशिष्ट समुदायाची जोडपी नसून सर्वधर्मीय जोडपी असल्याचे शेख यांनी सांगितले आहे.

लव्ह जिहादबाबत समिती स्थापन करण्यामागे अल्पसंख्यांक समजाची बदनामी करणे, दोन समुदायांमध्ये तेढ निर्माण करणे आणि विशिष्ट समुदायास जाणूनबुजून त्रास देणे, असा हेतू तत्कालीन महिला व बालविकास मंत्री लोढा यांचा होता.

त्यामुळे विशिष्ट हेतूने स्थापन केलेली ही समिती व त्याबाबतचा शासन निर्णय त्वरीत रद्द करण्यात यावा,अशी मागणी आमदार रईस शेख यांनी केली आहे.

शिवाय, तत्कालीन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी ८ मार्च २०२३ रोजी सभागृहामध्ये लव्ह जिहाद संदर्भात खोटी माहिती देवून दिशाभूल केल्याचा आरोप करत यांसदर्भात सरकारने वस्तुस्थिती स्पष्ट करण्याबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना आमदार शेख यांनी एक निवेदन दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही; दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे – एकनाथ शिंदे

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT