मुंबई

आणखी किती दिवस थंडीत पडणार पाऊस ? हवामान खात्याने दिलं उत्तर

सुमित बागुल

मुंबई आणि उपनगरात मध्यरात्रीपासून पावसाची हजेरी पाहायला मिळतेय. गेले काही दिवस मुंबई आणि उपनगरांमधील वातावरण ढगाळ असून दररोज रिमझिम पाऊस पडतोय. अशात मध्यरात्रीपासूनच मुंबई, ठाणे कल्याण डोंबिवली या भागांमध्ये पावसाने हजेरी लावल्याचं पाहायला मिळतंय. रिमझिम पाऊस आणि गारवा यामुळे नागरिक मात्र सुखावलेत. 

दरम्यान मुंबई, ठाणे , कल्याण डोंबिवली, भिवंडी या भागांमध्ये पडणारा पाऊस हा अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं पडतोय. महत्त्वाची बाब म्हणजे थंडीच्या दिवसात पाऊस पडण्याची ही पहिलीच वेळ आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस म्हणजेच ४८ तास वातावरण असंच ढगाळ राहणार आहे. राज्यभरात पुढील ४८ तास वातावरण ढगाळ राहणार असल्याची शक्यताही हवमान विभागाने दिली आहे. 

महत्त्वाची बातमी : आजपासून मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये होणार वाढ; मुंबईकरांना मिळणार दिलासा
 
हिवाळी अधिवेशनात जोरदार पावसाची हजेरी : 

दोन दिवसीय हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झालीये. मात्र हिवाळी अधिवेशनात जोरदार पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने अनेकांची तारांबळ उडाली. मंत्री आणि विधिमंडळ सदस्यांसाठी अंथरलेला लाल कार्पेट ओलाचिंब झालाय. तर अनेकांना विधान भवनाच्या गेटपासून विधान भवनात भिजत यावे लागत आहे.  

पिकांचं नुकसान 

गेले काही दिवस थंडीत पडत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं पुहा एकदा नुकसान होताना पाहायला मिळतंय. ढगाळ वातावरण आणि रिपरिप पावसाने  बागायतदार आणि भातशेती असलेला शेतकरी चिंतेत आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी कापून ठेवलेल्या भाताच्या पेंढी भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होत आहे.

low pressure belt in Arabian sea mumbai and suburbs to witness drizzles in winter

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Balochistan Blast : बलुचिस्तानात पाकिस्तानी सुरक्षा दलाच्या ताफ्यावर मोठा हल्ला; २३ जवानांचा मृत्यू , BLAचा हात असल्याचा संशय

राष्ट्रपतींच्या ADCला करता येत नाही लग्न, काय असतात अटी? कशी होते निवड? १ जागा, ३० जण शॉर्टलिस्ट, १४ दिवसांची मॅरेथॉन मुलाखत

रस्त्यावर झोपून काढले दिवस, आज दीड एकरमध्ये उभा आहे आलिशान बंगला; पाहा मिथुन चक्रवर्तींच्या घराची झलक

Marathi News Live Updates : अरविंद केजरीवाल यांची 'गोवा फॉरवर्ड पार्टी' आणि 'आम आदमी पार्टी' च्या युतीची घोषणा

भांडुपमध्ये पोलिसांची मोठी कारवाई! २० लाखांचा गुटखा पानमसाला जप्त, नऊ आरोपींना अटक; पाच वाहने जप्त

SCROLL FOR NEXT