Delisle Road Bridge Esakal
मुंबई

Delisle Bridge: डिलाईल पूल वाहतुकीसाठी होणार खुला; पालिकेच्या पूल विभागाची परवानगी

डिलाईल पूल वाहतुकीसाठी खुला; पालिकेच्या पूल विभागाची परवानगी

सकाळ डिजिटल टीम

Delisle Bridge: लोअर परळ येथील डिलाईल रोड पूल वाहतुकीसाठी खुला करण्याआधी २५ टन वजनाचे लोड ट्रक पुलावर उभे केले. त्यानंतर पालिकेच्या पूल विभागाने तपासणी केल्यानंतर डिलाईल रोड पूल वाहतुकीसाठी खुला करण्यास पूल विभागाने परवानगी दिली आहे.

त्यामुळे येत्या गुरुवारी डिलाईल रोड पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या पूल विभागाने दिली आहे.

धोकादायक झाल्याने आयआयटीच्या अहवालानंतर २०१८ मध्ये लोअर परळ येथील डिलाईल रोड पूल वाहतुकीसाठी बंद करून पाडण्यात आला. त्यानंतर २०२२ मध्ये पूल वाहतुकीसाठी खुला होणे अपेक्षित होते.

मात्र २०२० मध्ये मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाला आणि मुंबईतील सर्व कामांना ब्रेक लागला. यात डिलाईल रोड पुलाचे कामही रखडले होते. अत्यंत वर्दळीचा असलेल्या या पुलाचे काम रखडल्याने दक्षिण मुंबईतून पूर्व व पश्चिम उपनगरात जाणारी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली. पूल सुरु करावा, अशी मागणी स्थानिकांसह विरोधकांनी लावून धरली. मात्र अनेक कारणांमुळे पुलाचे काम रखडले होते.

या पुलावरुन राजकारणही रंगले होते. अखेर पाच वर्षांनंतर १ जून रोजी पुलाची एक लेन वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे. उर्वरित बाजू दिवाळीपर्यंत वाहतुकीसाठी खुली करण्यात येईल, असे आश्वासन पालिका प्रशासनाकडून देण्यात आले. मात्र दिवाळी संपली तरी पूल वाहतुकीसाठी खुला होत नसल्याने आमदार आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.

पालिकेच्या परवानगी विना पूल वाहतुकीसाठी खुला केल्याने ठाकरे गटातील आदित्य ठाकरेंसह अन्य नेत्यांविरोधात पालिका प्रशासनाने एन एम जोशी मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

डिलाईल रोड पूल वाहतुकीसाठी खुला करण्याआधी पालिकेच्या पूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुलाची तपासणी केली, ४८ तास तपासणी केल्यानंतर पूल वाहतुकीसाठी खुला करण्यास मान्यता दिल्याने गुरुवार २३ नोव्हेंबरपासून पूल मुंबईकरांच्या सेवेत येईल, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

पुलाचे उद्घाटन करणार कोण?

गुरुवार २३ नोव्हेंबरपासून डिलाईल रोड पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचे ठरले आहे. पुलाचे उद्घाटन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री यापैकी कोणाच्या हस्ते उद्घाटन करायचे, कोणाची वेळ मिळणार यासाठी पालिका प्रशासनाची धावपळ सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेगावजवळ ओव्हरहेड केबल तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; अमरावती–पुणे एक्स्प्रेससह अनेक गाड्या खोळंबल्या

२०४७ पर्यंत एसटी बसेस १०० टक्के ईव्ही करणार, चार्जिग स्टेशन उभारण्याच्या कामाला गती देण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

Pune News : सुप्रिया सुळेंच्या आरोपांना पोलिस आयुक्तांचे उत्तर! आकडेवारीसह मांडले पुण्याच्या सुरक्षेचे वास्तव

Mumbai T20 League: शाश्वत जगतापचे खणखणीत शतक अन् ईगल ठाणे स्ट्रायकर्सचा बांद्रा ब्लास्टर्सवर दणदणीत विजय

Thane: महावितरणविरोधात आंदोलन अन्‌ राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यावर गुन्हा; प्रशासनावर नेत्याचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT